मुंबई विद्यापीठाबाहेर प्रहार विद्यार्थी संघटनेचे आंदोलन Rojgar News

मुंबई विद्यापीठाबाहेर प्रहार विद्यार्थी संघटनेचे आंदोलन Rojgar News

Prahar Vidyarthi Sanghatana : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा प्रवेश आणि विविध मागण्यांसाठी प्रहार विद्यार्थी संघटनेने मुंबई विद्यापीठाच्या मुख्यद्वाराबाहेर आंदोलन केले. यानंतर कार्यकर्त्यांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले. जयहिंद आणि झेवियर्स कॉलेज मधील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या चौकशी आणि ऑडिट करावे, विद्यापीठातून केली जाणारी शुल्क वसुली, अग्निशमन व्यवस्था, मेरीट लिस्ट अशा विविध प्रश्नांसंदर्भात हे आंदोलन करण्यात आले असून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. झेवियर्स आणि जयहिंद या दोन्ही कॉलेजमधील मॅनेजमेंट आणि अल्पसंख्यांक कोट्याची चौकशी करावी, सेल्फ फ़ायनासिंग कोर्सेसला पात्रताधारक आणि नियमित प्राध्यपक उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी आंदोलकांतर्फे यावेळी करण्यात आली. विद्यापीठासाठी देण्यात आलेली रुग्णवाहिका कॅम्पसमध्ये नसते, विद्यार्थ्यांना पूर्णवेळ डॉक्टर किंवा वैद्यकीय सुविधा नाही, लायब्ररी तसेच खेळाच्या मैदानाची व्यवस्था नाही असे प्रहार संघटनेतर्फे सांगण्यात आले. विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या काही महाविद्यालयामधे विद्यार्थ्यांकडू नियमबाह्य पद्धतीने शुल्क वसुली झाली असून त्यावर विद्यापीठाचा वचक नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. प्रहार संघटनेच्या आंदोलकांनी विद्यापीठाच्या गेटबाहेर जोरदार निदर्शने केली तसेच कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली. या आंदोलनानंतर प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज टेकाडे, सरचिटणीस अजय तापकिर यांच्यासह ७० कार्यकर्त्यांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jKFKCg
via nmkadda

0 Response to "मुंबई विद्यापीठाबाहेर प्रहार विद्यार्थी संघटनेचे आंदोलन Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel