Advertisement

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाच्या उद्रेकानंतर बंद झालेले शाळेचे दरवाजे आज, सोमवारी तब्बल पावणे दोन वर्षांनी उघडणार आहेत. शाळांमध्ये घंटा पुन्हा वाजणार असली तरी सीनिअर कॉलेजांशी जोडलेल्या ज्युनिअर कॉलेजांतील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस घरातूनच वर्गात उपस्थिती लावावी लागणार आहे. या कॉलेजांनी आज, सोमवारपासून अकरावी, बारावीचे वर्ग सुरू न करता आणखी एक आठवडा प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू होणार आहेत. हे वर्ग सुरू करत असताना सीनिअर कॉलेजांना जोडलेल्या ज्युनिअर कॉलेजांनी इतक्यात प्रत्यक्ष वर्ग सुरू करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. काही कॉलेजांमध्ये निर्जंतुकीकरणाचा पहिला टप्पा पार पडला आहे. आणखी एक टप्प्यानंतर आठवड्याची प्रतीक्षा करून ज्युनिअर कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे. याचबरोबर काही कॉलेजांतील कर्मचारी निवडणूक कामांना नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना परत बोलावण्यात आले आहे. ते रुजू झाल्यानंतर आठवडाभरात कॉलेज सुरू करण्याचा विचार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मुंबईतील कॉलेजांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे लोकलने प्रवास करून येतात. या सर्व विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू नये असे सांगण्यात आले आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या दोन लसमात्रा न झाल्याने ते लोकल प्रवासासाठी पात्रही असणार नाहीत. यामुळे कॉलेजपासून लांब राहणारे बहुतांश विद्यार्थी हे प्रत्यक्ष हजर होतील का, याबाबत प्राचार्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. या सर्व बाबींचा सरकारने विचार करावा, अशी सूचनाही काही प्राचार्यांनी केली आहे. मराठी शाळांना निधी द्यावा शाळेची इमारत, इतर सोयीसुविधा सुस्थितीत ठेवणे, दैनंदिन खर्च भागवण्यासाठी राज्य सरकारकडून वेतनेतर अनुदान प्राप्त होते. गेल्या काही वर्षापासूनच्या या अनुदानाची थकबाकी तातडीने देण्यात यावी. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संस्थेचा खर्च अतोनात वाढला आहे. त्यामुळे सर्व मराठी शाळांना विशेष अनुदान जाहीर करावे, अशी मागणी होत आहे. वाढीव खर्च पेलणे मराठी शाळांसाठी अशक्य झाले आहे. तरी तातडीने सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी मराठी शाळा संस्थाचालक संघाने केली आहे. संस्थाचालक संघाची नुकतीच एक ऑनलाइन झाली. या बैठकीत संघाने मराठी शाळांचे प्रश्न मांडले आणि अनेक मागण्या केल्या. एका रिक्षात एक विद्यार्थी अथवा स्कूल बसमध्ये एका सीटवर एक विद्यार्थी अशा निर्बंधामुळे अतिरिक्त खर्च करावा लागेल. मुंबईसारख्या ठिकाणी अनेक विद्यार्थी बेस्ट बसचा वापर करतात. परंतु आता बेस्टमध्ये शालेय विद्यार्थ्यांना प्रवेश नाही. त्यामुळे अडचणी वाढणार असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l3e6Bw
via nmkadda