Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-10-08T08:43:19Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

इस्त्रोकडून ५ दिवसांचा ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्स; 'येथे' करा अर्ज Rojgar News

Advertisement
online Course: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननं (ISRO) तर्फे पाच दिवसांचा ऑनलाइन कोर्स आणण्यात आलाय. यासाठी प्रोफेशन्सल आणि रिसर्च ( for professionals) क्षेत्राशी संबंधित उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हा संपूर्ण कोर्स पाच दिवसात पूर्ण होणार असून ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. त्यामुळे तुम्हाला या कोर्सससाठी कुठे घराबाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथून ऑनलाइन माध्यमातून कोर्सशी कनेक्ट होऊ शकता. अमृत उपयोजनेअंतर्गत मास्टर प्लॅन फॉर्म्युलेशन सक्षम करण्यासाठी भू-स्थानिक इनपुट (Geospatial Inputs for Enabling Master Plan Formulation under AMRUT Sub-scheme) या विषयावर हा कोर्स असणार आहे. इस्त्रोच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात सविस्तर माहिती तसेच ऑनलाइन अर्जाची लिंक देण्यात आली आहे. सर्व उमेदवारांसाठी हा कोर्स निशुल्क असणार आहे. कोर्समध्ये ७० टक्के उपस्थितीत अनिवार्य आहे. त्यामुळे यापेक्षा कमी उपस्थिती असलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाणार नाही. जिओस्पेशियल मॉडेलिंग आणि शहरी आणि प्रादेशिक क्षेत्रांसाठी अनुप्रयोगांवर आधारित हा विषय असेल. हा कोर्स ११ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. या कोर्समध्ये पाच दिवस पास विषय शिकविले जाणार आहेत. प्रत्येक विषय हा दीड तास शिकविला जाणार आहे. हा कोर्स शहरी आणि प्रादेशिक नियोजन, शहरी आणि प्रादेशिक नियोजन, भूगोल, पर्यावरण अभ्यास, स्थापत्य इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर या क्षेत्राशी संबंधित उमेदवारांसाठी बनविण्यात आला आहे. प्रोग्रामचा संपूर्ण तपशील, अंमलबजावणी आणि वितरण, रिमोट सेन्सिंग डेटा सेटची माहिती यामध्ये शिकविली जाणार आहे. शहरी वैशिष्ट्यांची ओळख आणि व्याख्या, ज्योग्राफिकल इन्फोर्मेशन सिस्टिम आणि मॉडेलिंग, मॅप प्रोजेक्शनचा अभ्यासक्रमाचा देखील यामध्ये समावेश आहे. या कोर्समध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे स्वत:चाडेस्कटॉप/ कम्प्युटर किंवा लॅपटॉप असणे गरजेचे आहे. जेणेकरुन त्यांच्या कोर्समध्ये कोणताही अडथळा येणार आहे. या कॉम्प्युटरवर Windows, Macintosh, Linux, Android किंवा IoS ही ऑपरेटींग सिस्टिम असणे गरेजेचे आहे. गुगल क्रोम, फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज किंवा सफारी या वेब ब्राऊजरमधून उमेदवार लॉगिन करु शकतात. यासाठी २ एमबीपीएस किंवा३जी पेक्षा जास्त इंटरनेट स्पीड असणे गरजेचे आहे. असा करा अर्ज या कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराला अधिकृत वेबसाइटवरील ईलर्निंगच्या लिंकवर क्लिक करावे लागेल. यामध्ये मागितलेल्या वैयक्तिक माहितीचा तपशील भरावा लागेल. उमेदवारांनी आपला सुरु असेलला ईमेल आयडी आणि फोन नंबर द्यावा. आणि एकदा फॉर्म तपासून घ्या आणि त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. इस्त्रोतर्फे स्पेस चॅलेंज भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांच्या सहकार्याने नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनने देशातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी 'स्पेस चॅलेंज' आणले आहे. हे आव्हान देशातील सर्व शाळांमधील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी तयार करण्यात आले आहे. यामध्ये ATL (अटल टिंकरिंग लॅब) प्रयोगशाळा असलेल्या शाळा देखील ATL नसलेल्या शाळांशी संबंधित आहेत. अधिकृत निवेदनात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या सहकार्याने अटल इनोव्हेशन मिशन (AIM) ने देशातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ATL स्पेस चॅलेंज सादर केले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना खुले व्यासपीठ प्रदान करण्यात आले आहे. जिथे विद्यार्थी नवकल्पना सादर करू शकतात आणि स्वतः डिजिटल युगाच्या अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित समस्या सोडवू शकतात. एटीएल स्पेस चॅलेंज २०२१ हे जागतिक अंतराळ सप्ताह २०२१ सोबत जोडण्यात आले आहे. अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाची आठवण म्हणून हा सप्ताह दरवर्षी ४ ते १० ऑक्टोबर दरम्यान जागतिक पातळीवर साजरा केला जातो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FsoSJL
via nmkadda