Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १२, २०२१ WIB
Last Updated 2021-10-12T06:43:35Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ऑल इंडिया बार एक्झामचे प्रवेशपत्र जाहीर, 'असे' करा डाऊनलोड Rojgar News

Advertisement
16 : ऑल इंडिया बार एक्झामचे(AIBE) प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com वर पाहता येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार AIBE च्या अधिकृत वेबसाइटवरूनच प्रवेशपत्र ( 2021) डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र (AIBE 16 Admit 2021) डाउनलोड करण्यासाठी बार काऊन्सिल ऑफ इंडियाने (BCI) जाहीर केलेल्या सूचनेनुसार, उमेदवारांनी नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉगिन करणे आवश्यक आहे. बार काऊन्सिल ऑफ इंडियाने 'ऑल इंडिया बार परीक्षा २०२१' च्या महत्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. AIBE परीक्षेच्या प्रवेशपत्रात काही त्रुटी/चूक असल्यास उमेदवारांनी त्वरित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. AIBE 16 Admit 2021: असे करा डाऊनलोड सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com वर जा. वेबसाइटच्या होमपेजवर उपलब्ध असलेल्या प्रवेशपत्र डाउनलोड बटणावर क्लिक करा. समोर डॅशबोर्ड उघडेल. आता नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉगिन करा. सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर, AIBE 2021 हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल. हॉल तिकिटाची प्रिंट डाउनलोड करा आणि घ्या. AIBE म्हणजे काय? ऑल इंडिया बार एक्झाम (AIBE) ही राष्ट्रीय स्तरावरील कायदा परीक्षा आहे. भारतात कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रॅक्टीस करण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विधी क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागते. याशिवाय अंतिम वर्षाचे विद्यार्थीही या परीक्षेला बसू शकतात. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. यापूर्वी ऑल इंडिया बार परीक्षा XV (AIBE-XV) २४ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आली होती. ही परीक्षा देशभरातील ५२ शहरांमध्ये घेण्यात आली. यासाठी १४० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली, ज्यात सुमारे १ लाख २० हजार वकील उपस्थित झाले. परीक्षेचा तपशील ही परीक्षा ऑफलाइन मोडमध्ये आयोजित केली जाते. ही ओपन बुक एक्झाम आहे. प्रश्नांची संख्या: यात १०० प्रश्न विचारले जातात. परीक्षेचा कालावधी: AIBE २०२१ ही परीक्षा ३ तासांची असते. प्रश्न प्रकार: यामध्ये प्रश्न MCQ प्रकाराचे प्रश्न विचारले जातात. भाषेचे माध्यम: परीक्षेची भाषा इंग्रजी, हिंदी, गुजराती, बंगाली, आसामी, मराठी, उडिया, तेलुगु, तमिळ, पंजाबी, कन्नड आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YyZPDP
via nmkadda