मुंबई विद्यापीठ आयडॉलच्या १७ अभ्यासक्रमांना यूजीसीची परवानगी Rojgar News

मुंबई विद्यापीठ आयडॉलच्या १७ अभ्यासक्रमांना यूजीसीची परवानगी Rojgar News

मुंबई: शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी यूजीसीने मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या १७ अभ्यासक्रमास परवानगी दिली आहे. यानुसार आयडॉलचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. यावर्षी यूजीसीने आयडॉलच्या एमए भूगोल व एमएमएस (एमबीए ) या नवीन अभ्यासक्रमास परवानगी दिली आहे. पुढील वर्षी एमए मानसशास्त्र, एमएसडब्ल्यू, पत्रकारिता यासारखे इतरही अनेक नवीन अभ्यासक्रम आयडॉलमधून सुरु केले जातील असे आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले. १७ अभ्यासक्रमास परवानगी कोविडमुळे यूजीसी-डीईबीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या जुलै सत्राची सुरुवात नोंव्हेंबर पासून सुरु करण्याचे ठरविले. यानुसार यूजीसीने या शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमाच्या मान्यतेची प्रक्रिया नुकतीच पूर्ण केली. यानुसार मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या १७ अभ्यासक्रमास यूजीसीने परवानगी दिली आहे. मागील वर्षी १५ अभ्यासक्रमास परवानगी देण्यात आली होती. प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर पदवी स्तरावरील प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी व बीएस्सी संगणकशास्त्र व पदव्युत्तर स्तरावरील प्रथम वर्ष एमए, एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी आयटी, एमसीए व एमएमएस (एमबीए ) याच्या प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. एमएमएस (एमबीए ) व एमसीए प्रवेश परीक्षा एमएमएस (एमबीए ) व एमसीए हे दोन अभ्यासक्रम व्यावसायिक असल्याने याची प्रवेश परीक्षा लवकरच घेतली जाईल. या दोन्हीही अभ्यासक्रमाला युजीसीबरोबरच एआयसीटीईचीही मान्यता मिळाली आहे. एआयसीटीईने आयडॉलला एमएमएस (एमबीए ) च्या ७२० जागा तर एमसीएच्या २००० जागांना मान्यता दिली आहे. यातील एमसीए हा अभ्यासक्रम यावर्षीपासून दोन वर्षाचा करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठ प्रथमच एमएमएस (एमबीए) हा अभ्यासक्रम दूरस्थ माध्यमातून चालविणार आहे. यासाठी आयडॉलला मुंबई विद्यापीठाची बजाज व्यवस्थापन संस्था व अल्केश दिनेश मोदी व्यवस्थापन संस्था शैक्षणिक सहकार्य करीत आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZchfGN
via nmkadda

0 Response to "मुंबई विद्यापीठ आयडॉलच्या १७ अभ्यासक्रमांना यूजीसीची परवानगी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel