Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-10-27T14:43:06Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर, 'या' लिंकवरुन तपासा Rojgar News

Advertisement
MHT CET : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी सीईटी) निकाल जाहीर करण्यात आला आहे. MHT CET ला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन आपला निकाल तपासू शकतात. बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन किंवा बातमीखाली देण्यात आलेल्या लिंकवरुन उमेदवारांना निकाल पाहता येणार आहे. MHT CET Result 2021: असा तपासा निकाल स्टेप १ : MHT CET निकाल तपासण्यासाठी अधिकृत साइट cetcell.mahacet.org वर जा स्टेप २: होमपेजवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: मागितलेली माहिती भरा आणि सबमिट करा. स्टेप ४ तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. स्टेप ५: निकाल तपासा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा राज्यातून पाच लाख पाच हजार ७८८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये पीसीएम ग्रुपसाठी दोन लाख २८ हजार ४८६; तर पीसीबी ग्रुपसाठी दोन लाख ७७ हजार ३४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. ग्रुपनुसार विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दिवशी परीक्षेसाठी वेळ देण्यात आली होती. १५ ऑक्टोबरला या परीक्षेचा निकाल जाहीर होईल, अशी संभाव्य तारीख प्रवेश परीक्षा कक्षाने दिली होती. मात्र, अद्याप निकाल जाहीर झाला नाही. यामुळे प्रवेश प्रक्रिया कधी पूर्ण होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या सध्याच्या वेळापत्रकानुसार नवीन प्रवेशाची पहिली फेरी २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होऊन इंजिनीअरिंग कॉलेज सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप निकालच जाहीर न झाल्याने प्रवेश प्रक्रिया कशी पूर्ण होणार याबाबत प्रश्न विचारले जात आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Eq2hfF
via nmkadda