Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २५, २०२१ WIB
Last Updated 2021-10-25T13:43:41Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

एचएलएल लाईफकेअर लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती Rojgar News

Advertisement
HLL : लाईफकेअर लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदभरतीअंतर्गत विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आला आहे. एचएलएल लाईफकेअर लिमिटेडमधील भरतीअंतर्गत महाराष्ट्रात ६ जागा भरण्यात येणार आहेत. हिंदी अनुवादक (Hindi Translator), कनिष्ठ लेखा अधिकारी (Junior Accounts Officer), व्यवसाय विकास कार्यकारी (Business Development Executive), क्षेत्र विक्री व्यवस्थापक (Area Sales Manager), क्षेत्र विक्री व्यवस्थापक (Area Sales Manager) / सहाय्यक प्रादेशिक व्यवस्थापक ( Assistant Regional Manager ) / उप प्रादेशिक व्यवस्थापक, विपणन कार्यकारी (Deputy Regional Manager, Marketing Executive)/ व्यवसाय विकास कार्यकारी (Business Development Executive)/ सेवा कार्यकारी (Service Executive), वरिष्ठ तांत्रिक कार्यालय (Senior Technical Office), तांत्रिक अधिकारी (Technical Officer), कनिष्ठ तांत्रिक अधिकारी (Junior Technical Officer), उप प्रादेशिक व्यवस्थापक खरेदी (Sub Regional Shopping manager)आणि इतर पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील पदभरतीमध्ये एरिआ सेल्स मॅनेजर/असिस्टंट रिजनल मॅनेजर/डेप्युटी रिजनल मॅनेजर (कंज्युमर बिझनेस डिव्हीजन) च्या ६ जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी FMCG मधील किमान ६ वर्षांचा अनुभव, ओटीसी प्रोडक्टमधील सुपरवायझर कॅटेगरीचा अनुभव असणे गरजेचे आहे. फ्रंट लाइन सेल्समधील ही भरती असणार आहे. सेल्स अॅण्ड सर्व्हिस (वेंडींग बिझनेस डिव्हिजन) अंतर्गत मार्केटींग एक्झिक्युटिव्ह/ बिझनेस डेव्हलपमेंट/ एक्झिक्युटिव्ह/ सर्व्हिस एक्झिक्युटिव्हमधील १ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी उमेदवाराकडे पदवीधर/सेल्समधील डिप्लोमा १ वर्षाचा अनुभव/ मार्केटींग/ बिझनेस डेव्हलपमेंट/ अवेरनेस कॅम्पेनचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3AUSAF3 वर यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vK2d7q
via nmkadda