सरकारी नोकरीची संधी; वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये भरती Rojgar News

सरकारी नोकरीची संधी; वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये भरती Rojgar News

WCL Recruitment 2021: भारत सरकारच्या कोल इंडिया लिमिटेडची सब्सिडियरी आणि एक मिनिरत्न कंपनी, (WCL) ने मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आपल्या खाणी क्षेत्रात ग्रुप सी आणि ग्रुप बी पदांवरील भरतीसाठी जाहिरात दिली आहे. वेस्टर्न कोलफील्ड्स द्वारे ११ ऑक्टोबर २०२१ रोजी जारी झालेल्या भरतीच्या जाहिरातीनुसार, ग्रुप बीमध्ये सर्वेयर (माइनिंग) आणि ग्रुप सीमध्ये माइनिंग सरदारच्या एकूण २११ रिक्त जागांवर ही भरती होणार आहे. अर्ज कसा करावा अर्ज करण्यास इच्छुक आणि योग्य उमेदवार वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडची अधिकृत वेबसाइट, westerncoal.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २१ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होईल आणि उमेदवार २० नोव्हेंबर पर्यंत आपलं अॅप्लिकेशन सबमिट करू शकतील. उमेदवारांनी ऑनलाइन सबमिट केलेल्या अॅप्लिकेशनची सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करून सेव्ह करावी. वेस्टर्न कोलफील्ड्ससाठी पात्रता वेस्टर्न कोलफील्ड्स भरती अधिसूचना २०२१ नुसार माइनिंग सरदार पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे माइनिंग सरदारचे वैध प्रमाणपत्र किंवा माइनिंग व माइन सर्वेइंग डिप्लोमा आणि डीजीएमएस ने जारी केलेले संबंधित प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे आवश्यक असावे. सर्वेयर (माइनिंग) पदांसाठी उमेदवारांकडे दहावीसह डीजीएमएसने जारी केलेले संबंधित प्रमाणपत्र प्राप्त केलेलं असणं आवश्यक आहे. दोन्ही पदांसाठी उमेदवारांचे वय ११ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांहून अधिक नसावे. आरक्षित वर्गांसाठी उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल. अधिक माहितीसाठी वेस्टर्न कोलफील्ड्स भरतीची अधिसूचना पाहावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vbw9J9
via nmkadda

0 Response to "सरकारी नोकरीची संधी; वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel