Schools started: मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद; केल्या महत्वाच्या सूचना Rojgar News

Schools started: मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद; केल्या महत्वाच्या सूचना Rojgar News

मुंबई: आज राज्यात तब्बल दीड वर्षानी शाळेची घंटा घणघणली (School Started). मोठ्या काळानंतर शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर (CM Uddhav Thackeray) यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थी हे आपले आधारस्तंभ असल्याचे म्हटले आहे. आता एकदा उघडलेल्या पुन्हा बंद होणार नाहीत असा निर्धार करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. विद्यार्थ्यांची काळजी घ्या, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी शिक्षक आणि पालकांना केले आहे. (after the cm uddhav thackeray interacted with students, teachers and parents) विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू झाल्याबद्दल शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पालकांना, शिक्षकांना शुभेच्छा देतो. आपण सगळे जण एकत्र आहोत. एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होऊ द्यायची नाही हा निर्धार करू या आणि आपण नव्या आयुष्याला सुरुवात करुया. हा संवाद साधत असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, मला माझे शाळेतले दिवस आठवताहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचा दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. क्लिक करा आणि वाचा- आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आव्हानात्मक काळ सुरू आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होते आणि आहे. मुले नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. आज आपण मुलांच्या विकासाचे , प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. 'प्रकृतीकडे लक्ष ठेवूनच सर्वांनी काम करावे' मी नेहमी या विषयावर टास्क फोर्सशी चर्चा करतो.आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. शिक्षकाला बरे वाटत नसेल तर त्याने लगेच चाचणी करून घ्यावी. पावसाळा अजून संपला नाही. साथीचे रोगही येतात. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेऊन सर्वानी काम करावे. क्लिक करा आणि वाचा- 'कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकविले आहे' कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकविले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विदयार्थी, शिक्षक, पालक यांना शुभेच्छा देतो. मुलांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. ती निश्चितपणे पार पडली जाईल असा मला विश्वास आहे, असे सांगतानाच एकदा उघडलेली शाळा परत बंद करायची नाही या निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू, असे आवाहन त्यांनी केले. क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्यांनी केलेल्या महत्वाच्या सूचना: > शाळांच्या खोल्यांची दारे बंद नको, हवा खेळती हवी > निर्जंतुकीकरण करून घ्या. निर्जंतुकीकरण करतांना देखील काळजी घ्या. > मुलांच्या बसण्यात अंतर ठेवणे, मास्क घालणे, स्वच्छतालयांची स्वच्छता हवी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mpmSJs
via nmkadda

0 Response to "Schools started: मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद; केल्या महत्वाच्या सूचना Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel