SSC GD Constable : आयोगाने 'या' उमेदवारांना प्रवेशपत्र नाकारले, जाणून घ्या कारण Rojgar News

SSC GD Constable : आयोगाने 'या' उमेदवारांना प्रवेशपत्र नाकारले, जाणून घ्या कारण Rojgar News

2021: एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी अर्ज केलेल्या आणि प्रवेशपत्राची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) विविध दलांमध्ये आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) आणि रायफलमनच्या एकूण २५ हजार २७१ पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले होते. त्यानंतर भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी जाहीर करण्याबाबत महत्वाची नोटीस जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांचे अर्ज विविध कारणांमुळे फेटाळले गेले आहेत त्यांच्याकडून परीक्षेला बसण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही असे आयोगाने २५ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर केलेल्या सूचनेमध्ये म्हटले आहे. काही उमेदवारांना लेखी परीक्षेत बसण्याची परवानगी का दिली जाणार नाही याची सर्व कारणे सांगणारी SSC ने आपली नोटीस दिली आहे. अर्थात SSC GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र २०२१ या उमेदवारांना जाहीर केले जाणार नाही. सर्व कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १) ज्या उमेदवारांनी अर्ज करताना त्यांच्या फोटोच्या खाली फोटोच्या तारखेसह फोटो अपलोड केला नाही. किंवा फोटोची तारीख निर्धारित तारखेनुसार नाही. किंवा अवैध तारीख टाकली आहे. २) ज्या उमेदवारांचा अर्ज अपूर्ण आहे. आणखी एक संधी वरील दोन कारणांव्यतिरिक्त इतर कारणांमुळे ज्यांचे अर्ज फेटाळले गेले आहेत अशा सर्व उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचा पर्याय आयोगाने राखून ठेवला आहे. आयोगाच्या सूचनेनुसार, आपला अर्ज परीक्षा जाहीरातीनुसार भरला गेला नाही आहे असे उमेदवारांना वाटत असेल तर त्यांनी आयोगाने ईमेलद्वारे मागणी केल्यानुसार स्वत:चा तपशील पाठवून आयोगाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक, उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, उमेदवाराने निवडलेल्या पहिल्या परीक्षेतील शहराचे नाव आणि अर्ज नाकारण्याचे कारण ईमेलवर द्यावे लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nvu2MJ
via nmkadda

0 Response to "SSC GD Constable : आयोगाने 'या' उमेदवारांना प्रवेशपत्र नाकारले, जाणून घ्या कारण Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel