Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०७, २०२१ WIB
Last Updated 2021-10-07T12:43:44Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Tata Group Recruitment: टाटा कम्युनिकेशनमध्ये भरती, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

Advertisement
Tata Group Recruitment: टाटा कम्युनिकेशनने त्यांच्या मुंबई कार्यालयात विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या भरतीअंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक, कायदेशीर पदावर भरती केली जाणार आहे. यासाठी अनुभवी आणि कायदेशीर तज्ञ घेतले जाणार आहेत. टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड ही एक भारतीय दूरसंचार कंपनी आहे. जी पूर्वी विदेश संचार निगम लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. यापूर्वी ही कंपनी भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दूरसंचार विभागाच्या मालकीची होती. ती भारत सरकारने टाटा समूहाला विकली होती. कामाचे स्वरुप टाटा कम्युनिकेशन्सने मुंबईतील त्याच्या कार्यालयासाठी सहाय्यक व्यवस्थापक (लीगल) भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या नोकरीमध्ये कंपनीच्यावतीने कायदेशीर विवादांमध्ये भाग घेणे, सध्याच्या प्रादेशिक खटल्याचा डेटा बेस वेळोवेळी विकसित करणे आणि अपडेट करणे याचा समावेश असणार आहे. याशिवाय कंपनीतर्फे वेळोवेळी देण्यात आलेली न्यायालयीन कार्यवाही पूर्ण करण्यासाठी बाहेरील वकिलांसोबत काम करावे लागणार आहे. या कामात व्यावसायिक करार किंवा कायदेशीर कागदपत्रांचा मसुदा तयार करणे याचा समावेश असेल. याव्यतिरिक्त, कंपनीच्या धोरणांमध्ये होणाऱ्या सुधारणांची अंमलबजावणी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करावे लागणार आहे. सहाय्यक व्यवस्थापकास संबंधित पदावर काम करताना व्यवसायातील जोखीम आणि प्रशासनाचे मुद्दे कॉर्पोरेट उद्दिष्टांशी सुसंगत आहेत याची वेळोवेळी खात्री करावी लागेल. कामाचे स्वरुप उमेदवारास टीसीएलतर्फे विविध संस्थाद्वारे केलेल्या केसच्या जोखीमांचे मूल्यांकन आणि व्यवस्थापन करावे लागणार आहे. यामध्ये नवीन उत्पादन बाजारात आणताना लाँच कायदेशीर बाबींचे मूल्यांकन करणे, नवीन भौगोलिक क्षेत्रातील टेलिकॉम व्यवसायाचा विस्तार करणे या कामांचा समावेश आहे. केसेस आणि मध्यस्थी, पोलीस प्रकरणे, फाइलिंग, लायसन्स, ऑडीट, व्यवसाय गुंतवणूकीतील समस्या, जमीन वाद, अकाऊंट आणि टॅक्स आकारणी इत्यादीमधील विवादांचे निराकरण करण्यासाठी कायदेशीर सल्ला देणे. तसेच जगभरातील सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करताना बाहेरील वकिलांना मदत करणे. नवीन पेटंट अर्ज दाखल करणे आणि विद्यमान पेटंट पोर्टफोलिओ व्यवस्थापित करणे याचा देखील समावेश आहे. शिक्षण सहाय्यक व्यवस्थापक कायदेशीर पदासाठी उमेदवाराने एलएलबी किंवा एलएलएममध्ये चांगल्या गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त त अनुभव उमेदवारांना खासगी किंवा इन-हाऊस प्रॅक्टिसमध्ये पाच ते आठ वर्षांचा अनुभव असावा. उमेदवाराकडे मुख्य मुद्दे आणि प्राधान्यक्रम ओळखण्याचे आणि संबंधित बाबींचे बारकावे समजून घेण्याचे ज्ञान असले पाहिजे. तसेच त्यांच्याकडे समस्या ओळखण्याची आणि ती सोडविण्यासाठी विद्यमान पद्धती आणि तंत्रांमध्ये सुधारणा, बदल किंवा जुळवून घेण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. उमेदवार आपल्या टीमचे नेतृत्व करण्यास पूर्णपणे सक्षम असावा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/306iGHa
via nmkadda