Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १२, २०२१ WIB
Last Updated 2021-10-12T13:43:19Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

TCS Recruitment Drive: ३५ हजार पदवीधरांना मिळणार नोकरी Rojgar News

Advertisement
TCS Recruitment Drive: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS ने २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ४३ हजार फ्रेशर्सना काम करण्याची संधी दिली. आता पुढील सहामाहीत ३५ हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे. या कंपनीचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. टीसीएस कंपनीने गेल्या तिमाहीत एकूण १९ हजार ६९० कर्मचाऱ्यांची भरती केली. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या ५ लाख २८ हजार ७४८ वर गेली आहे. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या ३६.२ टक्के आहे. टीसीएस जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS जगातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान (IT) सेवा देणारी कंपनी आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस, टीसीएस ७८ हजार पदवीधरांची भरती करण्याचे लक्ष्य साध्य करणार आहे. या दिशेने कंपनीने ३५ हजार नवीन पदवीधरांच्या नियुक्तीसाठी नोटीस जाहीर केली आहे. टीसीएसला मदत करणारे शिफ्ट-लेफ्ट ट्रेनिंग टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे एचआर मिलिंद लक्कर म्हणाले, आमच्या प्रतिभेची पाईपलाईन तयार करण्यासाठी वेळेपूर्वी कर्मचारीरुपी गुंतवणूक केल्याने आम्हाला पुरवठा आणि इतर आव्हानांवर मात करण्यास मदत झाली आहे. आमच्या ग्राहकांचा विकास आणि परिवर्तन कार्यक्रमांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्यास यामुळे मदत झाली. सहा महिन्यांत ४३ हजार तरुणांना नोकरी ही तिमाही टीसीएससाठी अनेक प्रकारे समाधानकारक राहिली आहे. आम्ही गेल्या सहा महिन्यांत ४३ हजार नवीन पदवीधरांची विक्रमी भरती केली. आमच्या शिफ्ट-लेफ्ट ट्रेनिंग स्ट्रॅटेजीमुळे हे घडल्याचेही मिलंद लक्कड यांनी सांगितले. या प्रशिक्षणामुळे भरती प्रक्रियेला वेग आला आहे. आम्ही जैविक प्रतिभा विकासावर लक्ष्य केंद्रीत केले आणि करिअरसोबत शिक्षणाला जोडून कर्मचाऱ्यांना समाधान उंचावल्याचेही ते पुढे म्हणाले. भविष्य लक्षात घेऊन टीसीएसच्या नोकऱ्या टीसीएस भविष्याचा विचार करुन कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणार आहे. जी अँड टी लीडर्स तयार करण्यासाठी कॉन्टेक्चुअल मास्टर्स आणि एलिव्हेट सारखे कार्यक्रम वाढविले जात आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iR9Lju
via nmkadda