UGC NET Exam 2021: यूजीसी नेट परीक्षेची तारीख कधी होणार जाहीर? Rojgar News

UGC NET Exam 2021: यूजीसी नेट परीक्षेची तारीख कधी होणार जाहीर? Rojgar News

2021 Exam Date, Admit Card: नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) ने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) नेट परीक्षेच्या तारखेत बदल केला आणि नंतर जसं अॅडमिट कार्ड जारी होणार तसं परीक्षा स्थगित केली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानुसार, इतर अनेक महत्त्वाच्या परीक्षांसोबत क्लॅश होत होती, म्हणून लांबणीवर टाकण्यात आली. नव्या तारखांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परीक्षेच्या तारखेत का झाला बदल? तारीख २०२१ अधिसूचनेनुसार, आधी ही परीक्षा ६ ते ८ ऑक्टोबर आणि १७ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार होती. पण १० ऑक्टोबर रोजी काही परीक्षा यूजीसी नेट परीक्षेशी क्लॅश होत होत्या. त्यामुळे यूजीसी नेट परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला. यानंतर परीक्षेचा सुधारित कार्यक्रम जारी करण्यात आला, यानुसार यूजीसी नेट परीक्षा १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्याचे ठरले. यानंतर यूजीसीने ही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र, National Testing Agency (NTA) ने म्हटले होते की, विविध राज्यांमध्ये विविध पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा तसेच विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा होत आहेत. अनेक परीक्षांच्या तारखा क्लॅश होत आहेत. तूर्त ऑक्टोबरमध्ये अन्य परीक्षा झाल्यानंतर नोव्हेंबर मध्ये पुन्हा नव्या तारखांची घोषणा होऊ शकते. कधी होणार? यूजीसी नेट २०२१ परीक्षांच्या तारखांसंबंधीची माहिती ugc net official website वर पाहता येईल. यूजीसी नेट परीक्षा पॅटर्न यूजीसी नेट परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. प्रत्येक विषयासाठी दोन पेपर असतात. पेपर १ मध्ये MCQ प्रकारचे ५० प्रश्न असतात आणि पेपर २ मध्ये MCQ प्रकारचे १०० प्रश्न असतात. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तीन तासांचा वेळ दिला जातो. प्रत्येक योग्य उत्तरासाठी २ गुण असतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jiG4bg
via nmkadda

0 Response to "UGC NET Exam 2021: यूजीसी नेट परीक्षेची तारीख कधी होणार जाहीर? Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel