Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २३, २०२१ WIB
Last Updated 2021-10-23T06:43:54Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UGC NET परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर Rojgar News

Advertisement
Exam schedule : यूजीसी नेट परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आता डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ ची परीक्षा २० नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि ५ डिसेंबरपर्यंत वेगवेगळ्या तारखांना होणार आहे. परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या मते, यूजीसी राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET परीक्षा २०२१) चे प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले जाणार आहे. उमेदवारांना ugcnet.nta.nic.in या पोर्टलला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परीक्षेच्या तारखेत बदल यूजीसी नेट परीक्षा तारीख २०२१ अधिसूचनेनुसार, आधी ही परीक्षा ६ ते ८ ऑक्टोबर आणि १७ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार होती. पण १० ऑक्टोबर रोजी काही परीक्षा यूजीसी नेट परीक्षेशी क्लॅश होत होत्या. त्यामुळे यूजीसी नेट परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला. यानंतर परीक्षेचा सुधारित कार्यक्रम जारी करण्यात आला, यानुसार यूजीसी नेट परीक्षा १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्याचे ठरले. यानंतर यूजीसीने ही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र, National Testing Agency () च्या माहितीनुसार, विविध राज्यांमध्ये विविध पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा तसेच विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा होत आहेत. अनेक परीक्षांच्या तारखा क्लॅश होत आहेत. यूजीसी नेट परीक्षा पॅटर्न यूजीसी नेट परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. प्रत्येक विषयासाठी दोन पेपर असतात. पेपर १ मध्ये MCQ प्रकारचे ५० प्रश्न असतात आणि पेपर २ मध्ये MCQ प्रकारचे १०० प्रश्न असतात. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तीन तासांचा वेळ दिला जातो. प्रत्येक योग्य उत्तरासाठी २ गुण असतील. नवीन वेळापत्रकानुसार या परीक्षा दोन ब्लॉकमध्ये घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार, ते २० ते ३० नोव्हेंबर २०२१ आणि १ ते ५ डिसेंबर २०२१ पर्यंत परीक्षा घेतली जाईल. NTA ने १ ऑक्टोबर रोजी UGC NET परीक्षेच्या तारखांचे सुधारित वेळापत्रक पुन्हा जाहीर केले होते पण नवीन परीक्षेच्या तारखा नवीन नोटिसमध्ये जाहीर करण्यात आल्या नाहीत. त्याचबरोबर आता NTA ने परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. उमेदवारांनी या नवीन परीक्षेच्या तारखा लक्षात ठेवाव्यात आणि त्यानुसार परीक्षेची तयारी करावी. जर त्यांना काही प्रश्न असतील तर ते NTA हेल्प डेस्कवर०११-४०७५९०० वर कॉल करू शकतात. तसेच एनटीएला ugcnet@nta.ac.in वर कळवू शकता. या परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, विद्यार्थी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3puXN36
via nmkadda