UGC Recruitment: नेट पात्र उमेदवारांची भरती, ८० हजारपर्यंत मिळेल पगार Rojgar News

UGC Recruitment: नेट पात्र उमेदवारांची भरती, ८० हजारपर्यंत मिळेल पगार Rojgar News

2021: नेट परीक्षा उत्तीर्ण करुन नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) कोणत्याही विषयात मास्टर डिग्रीमध्ये प्रथम श्रेणीसह नेट परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यूजीसी, नवी दिल्लीने शैक्षणिक सल्लागार पदासाठी अर्ज आमंत्रित मागविले आहेत. ही भरती कंत्राटी तत्वावर केली जाणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक असलेले सर्व उमेदवार शैक्षणिक सल्लागार पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाइन माध्यमातून करता येईल. अधिकृत वेबसाइट www.ugc.ac.in/jobs ला भेट देऊन उमेदवार अर्ज करु शकतात. ३१ ऑक्टोबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यूजीसीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, या नोकरीसाठी प्रोबेशन कालावधी किमान सहा महिने आहे. तसेच कामाची गुणवत्ता पाहून पुढील कालावधी वाढविण्यात येईल. तसेच यूजीसीकडे कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी सेवा बंद करण्याचा अधिकार असेल. त्याचबरोबर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार सवलत दिली जाईल. निवड समितीच्या शिफारशीनुसार या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाईल. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहिती उमेदवारांना अधिकृत वेबसाइट www.ugc.ac.in/jobs मिळेल. पगार यूजीसीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ७० हजार ते ८० हजार रुपये वेतन दिले जाईल. पीएचडी अनिवार्य नाही सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी २०२१ पर्यंत पीएचडी अनिवार्य नसेल असा निर्णय जाहीर करण्यात आला होता. याता या निर्णयाला दोन वर्षांची मुजतवाढ देण्यात आल्याचे यूजीसीतर्फे सागंण्यात आले आहे. यूजीसीने विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या थेट भरतीसाठी पात्रता म्हणून पीएचडीची अनिवार्य आवश्यकतेसंबंधी तारीख वाढवली आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यूजीसीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, 'विद्यापीठ अनुदान आयोगाने ( ) १ जुलै २०२१ पासून विद्यापीठांच्या विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या थेट भरतीसाठी पात्रता म्हणून पीएचडीच्या अनिवार्यतेबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. १ जुलै २०२१ ही तारीख जुलै २०२३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3j5AJDU
via nmkadda

0 Response to "UGC Recruitment: नेट पात्र उमेदवारांची भरती, ८० हजारपर्यंत मिळेल पगार Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel