UGC कडून आणखी ७ संस्थांना ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम घेण्याची परवानगी Rojgar News

UGC कडून आणखी ७ संस्थांना ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम घेण्याची परवानगी Rojgar News

Allows : विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)आणखी सात विद्यापीठांना घेण्याची परवानगी दिली आहे. या सात संस्थांना मुक्त आणि दूरस्थ शिक्षण (ODL) अभ्यासक्रम घेता येणार आहे. विद्यापीठांना ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमची परवानगी देण्याची ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात आली होती. पण ही यादी या व्यतिरिक्त आहे. या सात संस्थांमध्ये आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी एका संस्थेचा समावेश आहे. जून आणि जुलैमध्ये झालेल्या आयोगाच्या स्थायी अपील समितीच्या (SAC) बैठकीनंतर ही यादी तयार करण्यात आली आहे. जामिया मिलिया इस्लामियाने विद्यापीठाद्वारे ऑफर केलेल्या ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. जामिया मिलिया इस्लामिया आता आणखी १० ऑनलाइन अभ्यासक्रम घेणार आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी, इतिहास आणि उर्दूमध्ये बीबीए, बीए आणि एमकॉमसह UGC द्वारे मान्यताप्राप्त काही नवीन अभ्यासक्रमांचा समावेश असेल. केरळच्या महात्मा गांधी विद्यापीठात आणखी १० ऑनलाइन अभ्यासक्रम जोडण्यात आले आहेत. बीकॉम, एमए अॅनिमेशन, मल्टीमीडिया आणि ग्राफिक डिझाईन, एमएससी इन स्टॅटिस्टिक्स हे नवीन अभ्यासक्रम महात्मा गांधी विद्यापीठात शिकविण्यास परवानगी देण्यात आली आहे. यूजीने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी ५० हून अधिक संस्थांना ओडीएल प्रोग्राम ऑफर करण्याची परवानगी दिली होती. UGC नियमांनुसार NAAC किंवा NIRF रँकिंग आवश्यकतांचे पालन करु संस्था ऑनलाइन अभ्यासक्रम घेऊ शकतात. तसे करण्यास अयशस्वी ठरल्यास अभ्यासक्रम बंद करु शकतात आणि त्यासंदर्भात यूजीसीला कळवू शकतात. जनतेमध्ये आर्थिक साक्षरतेसाठी पुढाकार विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालये/विद्यापीठांना आर्थिक साक्षरता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या गटाच्या माध्यमातून लोकांमध्ये आर्थिक साक्षरतेबाबत जागरूकता आणणे हा त्याचा उद्देश आहे. यूजीसी सचिव रजनीश जैन यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रात याबद्दल माहिती दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jFTNcj
via nmkadda

0 Response to "UGC कडून आणखी ७ संस्थांना ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम घेण्याची परवानगी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel