Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-10-08T06:43:52Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UPSC NDA II 2021: महिला उमेदवारांसाठी अर्ज करण्यासंदर्भात महत्वाची अपडेट Rojgar News

Advertisement
II 2021: वर्ष २०२१ च्या दुसऱ्या परीक्षेसाठी महिला उमेदवारांसाठी ८ ऑक्टोबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या परीक्षेसाठी इच्छुक महिला उमेदवार ज्यांनी अद्याप अर्ज केला नसेल त्या केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ची अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार UPSC ने महिला उमेदवारांना NDA (२) परीक्षा 2021 मध्ये उपस्थित राहण्याची संधी देण्यासाठी २४ सप्टेंबर २०२१ रोजी नोटिफिकेशन जाहारी करुन अर्जाची प्रक्रिया सुरु केली आहे. एनडीए (२) परीक्षा २०२१ साठी अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांनी अॅप्लिकेशन पोर्टलवर जावे. होम पेजवर दिलेल्या संबंधित लिंकवर क्लिक करावे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नवीन पेजवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या. उमेदवारांना प्रथम भाग नोंदणीच्या लिंकवर क्लिक करून आणि विचारलेले तपशील भरून नोंदणी करावी लागेल. यानंतर, उमेदवारांना देण्यात आलेला नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉगिन करून भाग २ ची नोंदणी पूर्ण करावी. एनडीए (२) परीक्षा २०२१ साठी अर्ज करताना महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. महिलांनाआयोगाने पूर्ण सवलत दिली आहे. वर्षातून दोन वेळा यूपीएससी एनडीए परीक्षेचे आयोजन करते. यंदा दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी केवळ महिला उमेदवारांसाठी अॅप्लिकेशन विंडो उघडण्याचा इतिहास यूपीएससीने घडवला आहे. शुक्रवार २४ सप्टेंबर २०२१ पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू होत असून यासंदर्भातील नोटीस आयोगाने जारी केली आहे. या नोटीसनुसार अविवाहित महिला उमेदवार एनडीए २ परीक्षा २०२१ साठी अॅप्लिकेशन फॉर्म ८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत भरू शकतात. अर्जांची पात्रता यूपीएससीद्वारे जारी एनडीए २ परीक्षा २०२१ अधिसूचनेनुसार सैन्यदलाच्या कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. वायूदल आणि नौदलासाठी उमेदवारांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित विषयांसह बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांचा जन्म २ जानेवारी २००३ पूर्वी किंवा १ जानेवारी २००६ नंतरचा असावा. फिजिकल स्टँडर्ड आणि रिक्त जागांची घोषणा नंतर यूपीएससी द्वारे महिला उमेदवारांसाठी एनडीए परीक्षा अॅप्लिकेशन विंडो उघडण्यासंदर्भात शुक्रवारी २४ सप्टेंबर २०२१ रोजी जारी झालेल्या नोटिसनुसार महिला उमेदवारांसाठी फिजिकल स्टँडर्ड आणि त्यांच्यासाठी आरक्षित जागांची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून जाहीर केली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Allvk8
via nmkadda