Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ११, २०२१ WIB
Last Updated 2021-10-11T14:43:59Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UPSC Prelims 2021: पूर्व परीक्षेतील प्रश्नपत्रिकेवर हरकतींसाठी विंडो खुली Rojgar News

Advertisement
UPSC Prelims 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाने () रविवारी, १० ऑक्टोबर २०२१ रोजी नागरी सेवा परीक्षा २०२१ च्या पहिल्या टप्प्यातील पूर्व परीक्षा देशभरातीलपरीक्षा केंद्रांवर प्रत्येकी २ तासांच्या दोन शिफ्टमध्ये घेतली. जनरल स्टडीज (जीएस) परीक्षा सकाळी ९,३० पासून पहिल्या शिफ्टमध्ये घेण्यात आली, तर सिव्हिल सर्व्हिसेस अॅप्टिट्यूड टेस्ट (CSAT) पेपर दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २.३० पासून घेण्यात आला. दोन्ही शिफ्ट पेपर आयोजित केल्यानंतर, यूपीएससीने प्रश्नपत्रिकेवरील हरकती दाखल करण्यासाठी ऑनलाइन विंडो उघडली आहे, १० ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासूनच ही लिंक सक्रीय करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना यूपीएससी प्रीलिम्स २०२१ च्या जीएस किंवा सीसॅट प्रश्नपत्रिकेबाबत कोणत्याही प्रकारचा आक्षेप घ्यायचा आहे, ते यूपीएससी अॅप्लिकेशन पोर्टल upsconline.nic.in येथे सक्रिय केलेली लिंक, किंवा या वृत्तात दिलेल्या थेट लिंकवरून हरकत नोंदवू शकतात. आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांना त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख ही माहिती द्यावी लागेल. आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार, हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर २०२१(संध्याकाळी ६ पर्यंत) आहे. ‘यूपीएससी’ची पूर्व परीक्षा सुरळीत केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) नागरी सेवा पूर्व परीक्षा रविवारी देशभरातील ७७ शहरांत सुरळीत पार पडली. या परीक्षेसाठी देशभरातून नऊ लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती. पुण्यातून साधारण ४० ते ५० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचा अंदाज आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या परीक्षेच्या तुलनेत, यंदा जीएस १ पेपरच्या प्रश्नपत्रिकेत थोडा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार क्रीडा क्षेत्रातील काही प्रश्न विचारण्यात आले होते. विविध क्षेत्रांत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांबाबत प्रश्न विचारण्यात आले. प्रश्नांचे स्वरूप क्लिष्ट व लांबलचक असल्याने, ते सोडविण्यात विद्यार्थ्यांचा भरपूर वेळ गेला. सी-सॅट प्रश्नपत्रिकेतील प्रश्नही नेमकेपणाने विचारण्यात आले नसल्याने, विद्यार्थ्यांना ते सोडवताना विचार करावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यापुढे सी-सॅटचा अभ्यासक्रम आणि प्रश्नांकडेही गांभीर्यांने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मार्गदर्शक डॉ. सुशील बारी यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DyaQEr
via nmkadda