Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १४, २०२१ WIB
Last Updated 2021-10-14T06:43:40Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UPSC तर्फे सहाय्यक कमांडंट भरती परीक्षेचा निकाल जाहीर Rojgar News

Advertisement
UPSC Result 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात सहाय्यक कमांडंट पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत बसलेले उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल () तपासू शकतात. यूपीएससीने जाहीर केलेल्या या रिक्त जागेतून एकूण १५९ पदांची भरती केली जाणार आहे. निकालाची लिंक (UPSC CAPF Result 2021) अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर सक्रिय करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) वतीने संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १५ एप्रिल २०२१ रोजी सुरू झाली. उमेदवारांना ऑनलाईन अर्जासाठी ५ मे २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती, फी जमा करण्याची शेवटची तारीखही तीच होती. या रिक्त पदासाठी ८ ऑगस्ट २०२१ रोजी परीक्षा घेण्यात आली. आता त्याचे निकाल अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहेत. असा तपासा निकाल निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- upsc.gov.in वर जा. वेबसाइटच्या होमपेजवर दिलेल्या भरती विभागात जा. यामध्ये लेखी निकाल वर जा. आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (ACs) परीक्षा 2021 च्या लिंकवर क्लिक करा. येथे डाउनलोड ऑप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जा. आता निकालाची PDF उघडेल. यामध्ये तुमचे नाव आणि रोल नंबरच्या मदतीने निकाल तपासा. निकाल तपासल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट घेऊ शकता. या पदांवर भरती यूपीएससीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण १५९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) या ३५ पदांमध्ये, केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) ३६ पदे, सीआयएसएफमध्ये ६७ पदे, आयटीबीपीसाठी ३० पदे, एसएसबीसाठी ०१ पद निश्चित करण्यात आले आहे. रिक्त जागांच्या संपूर्ण तपशील बातमीखाली लिंकद्वारे देण्यात आला आहे. शारीरिक तंदुरुस्ती या रिक्त पदासाठी जाहीर केलेल्या सूचनेनुसार, उमेदवारांच्या शारीरिक तंदुरुस्तीवर बारीक लक्षात ठेवले जाईल. शारीरिक पात्रतेमध्ये पुरुष उमेदवारांची उंची १६५ सेमी तर महिला उमेदवारांसाठी उंची १५७ सेमी आहे. पुरुषांची छाती ८१ ते ८६ सेमी असावी. पुरुषांच्या गटात शर्यतीसाठी १०० मीटर शर्यत घेतली जाते. त्यासाठी १६ सेकंदांचा वेळ दिला जातो. तर स्त्रीयांना १८ सेकंदात अंतर कापावे लागते. याशिवाय ८०० मीटर शर्यत आणि लांब उडीद्वारे शारीरिक तंदुरुस्ती दिसून येते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AFV7ld
via nmkadda