Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २३, २०२१ WIB
Last Updated 2021-10-23T12:43:15Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UPSC तर्फे विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

Advertisement
2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission, UPSC) सहाय्यक प्राध्यापक (), वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (Senior ) आणि वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) आणि इतर पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करणयात आली आहे. या अंतर्गत एकूण ६४ पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचा आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज पाठवायचा आहे. ११ नोव्हेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवार १२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत फॉर्मची प्रिंटआउट घेऊ शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचावे आणि त्यानुसार अर्ज करावा. कारण फॉर्ममध्ये काही विसंगती आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. रिक्त जागांचा तपशील असिस्टंट प्रोफेसर - १ जागा असिस्टंट डिफेन्स इस्टेट ऑफिसर - ६ जागा सनिअर सायंटिफिक ऑफिसर ग्रेड - II- ३ जागा सिनिअर सायंटिफिक ऑफिसर केमिस्ट्री - ३ जागा सिनिअर सायंटिफिक ऑफिसर II इंजिनीअरिंग - ३ जागा असिस्टंट डायरेक्टर - १ असिस्टंट डायरेक्टर आणि मेडिकल ऑफिसरसहित इतर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट- upsc.gov.in ला भेट द्या. होमपेजवर, रिक्रूटमेंट टॅबवर क्लिक करा आणि नंतर 'ऑनलाईन रिक्रूटमेंट अॅप्लिकेशन' वर क्लिक करा. आता Apply वर क्लिक करा आणि अर्ज भरण्यास सुरुवात करा. त्यानंतर सर्व तपशील भरा. कागदपत्रे अपलोड करा आणि आवश्यक शुल्क भरा. सबमिट वर क्लिक करा. तुमचा UPSC भरती २०२१ अर्ज सबमिट केला जाईल. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट डाउनलोड करा. अर्ज शुल्क UPSC द्वारे विविध पदांसाठी अर्ज करणार्‍या सामान्य / OBC / EWS पुरुष श्रेणी अंतर्गत अर्ज करणार्‍या उमेदवारांना २५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांच्या श्रेणी अंतर्गत अर्ज करणाऱ्यांना अर्ज शुल्कात सवलत देण्यात आली आहे. ५६ पदांची भरती केंद्रीय लोक सेवा आयोग (Union Public Service Commission) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत डेटा प्रोसेसिंग सहाय्यक (Data Processing Assistant), खासगी सचिव (Private Secretary), भारतीय माहिती सेवेचा वरिष्ठ दर्जा (Indian Information Service Senior Level), कनिष्ठ वेळ स्केल (Junior Time Scale), युवा अधिकारी (Young Officers) ही पदे भरली जाणार आहेत. या विविध पदांअतर्गत एकूण ५६ पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडूनऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहे. २८ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. डेटा प्रोसेसिंग सहाय्यक पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर अॅप्लीकेशन. इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी असणे गरजेचे आहे. अपंगत्व, सेरेब्रल पाल्सी, अॅसिड विक्टीम अशा उमेदवारांना या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी ३० वर्ष ही वयोमर्यादा आहे. उमेदवारांना अर्जासोबत २५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. २८ ऑक्टोबरनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pAgDG9
via nmkadda