UPSC तर्फे ८३८ पदांची भरती; प्रवेशपत्र 'येथे' करा डाऊनलोड Rojgar News

UPSC तर्फे ८३८ पदांची भरती; प्रवेशपत्र 'येथे' करा डाऊनलोड Rojgar News

CMS 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे कम्बाइंड मेडिकल सर्व्हिसेस परीक्षेचे ( Examination)प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. यूपीएससीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार ८३८ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया ७ जुलै २०२१ पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २७ जुलै २०२१ च्या संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता. या परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे. कम्बाइंड मेडिकल सर्व्हिसेस परीक्षा (Combined Medical Services Examination)२१ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. प्रवेशपत्र असे करा डाऊनलोड प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा. वेबसाइटच्या होमपेजवर दिलेल्या What's New लिंकवर क्लिक करा. कम्बाइंड मेडिकल सर्व्हिसेस परीक्षा २०२१ च्या पर्यायावर जा. नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि जन्मतारीख भरा. प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या. बातमीखाली देण्यात आलेल्या थेट लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करु शकता. रिक्त पदांचा तपशील या रिक्त पदासाठी जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार (UPSC CMS Recruitment 2021) एकूण ८३८ पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये केंद्रीय आरोग्य सेवेसाठी ज्युनियर स्केल पदावर ३४९ जागा, सहाय्यक विभाग वैद्यकीय अधिकारी रेल्वेसाठी ३०० जागा, जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर ग्रेड २ साठी ५ जागा आणि जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर दिल्ली नगर परिषदेमध्ये १८४ जागा भरल्या जाणार आहेत. इंजिनीअरिंग सर्व्हिस मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र इंजिनीअरिंग सर्व्हिस मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले आणि मुख्य परीक्षेची(UPSC Engineering Service Mains Exam) तयारी करत असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन प्रवेशपत्र (UPSC Admit Card 2021) डाउनलोड करू शकतात. UPSC ने जाहीर केलेल्या या रिक्त पदांद्वारे एकूण २१५ पदांची भरती केली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BpD5Uy
via nmkadda

0 Response to "UPSC तर्फे ८३८ पदांची भरती; प्रवेशपत्र 'येथे' करा डाऊनलोड Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel