Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २४, २०२१ WIB
Last Updated 2021-11-24T12:43:36Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Bank Jobs 2021: सेंट्रल बॅंकेत विविध पदांची भरती, १ लाखांपर्यंत मिळेल पगार Rojgar News

Advertisement
Bank Jobs 2021: बँकेत नोकरी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या पदभरती अंतर्गत जनरल ग्रॅज्युएट्स, लॉ ग्रॅज्युएट्स, एमबीए, इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, पीएचडी धारक उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. सेंट्रल बँकेतर्फे एसओ व्हॅकेंसी 2021 नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. रिक्त जागांचा तपशील अर्थतज्ञ – ०१ जागा प्राप्तिकर अधिकारी – ०१ पद इन्फॉर्मशन टेक्नोलॉजी (स्केल ५) – ०१ पदे डेटा सायंटिस्ट – ०१ जागा क्रेडिट ऑफिसर – १० पदे डेटा इंजिनीअर – ११ पदे आयटी सिक्योरीटी अॅनालिस्ट – ०१ IT SOC अॅनालिस्ट – ०२ पदे जोखीम व्यवस्थापक (स्केल 3) – ०५ पदे टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट) – ०५ पदे फायनान्शिअल अॅनालिस्ट – २० पदे इन्फॉर्मशन टेक्नोलॉजी (स्केल २) – १५ पदे लॉ ऑफिसर – २० पदे रिस्क मॅनेजमेंट (स्केल २) – १० पदे सिक्योरीटी (स्केल २) – ०३ पदे सिक्योरीटी (स्केल १) – ०९ पदे एकूण पदांची संख्या – ११५ निवड प्रक्रिया ऑनलाइन लेखी चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी एकूण १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये १०० प्रश्न विचारले जातील. परीक्षा एक तासाची असेल. महत्वाच्या तारखा ऑनलाइन अर्जाची सुरुवात – २३ नोव्हेंबर २०२१ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ डिसेंबर २०२१ लेखी परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड - ११ जानेवारी २०२२ पासून लेखी परीक्षेची तारीख (तात्पुरती) – २२ जानेवारी २०२२ पात्रता सेंट्रल बँकेतर्फे विविध विभागांमध्ये एसओ पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्रत्येक विभाग आणि स्केलसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा भिन्न आहेत. नोटिफिकेशनमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पगार स्केल १ - ३६ हजार ते ६३,८४० रुपये प्रति महिना स्केल २ साठी - ४८, १७० ते ६९, ८१० प्रति महिना स्केल ३ साठी - ६३,८४० ते ७८, २३० प्रति महिना स्केल ४ साठी - ७६,०१० ते ८९, ८९० प्रति महिना स्केल ५ साठी - ८९,८९० ते रु १,००,३५० प्रति महिना असा भरा अर्ज या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियाची वेबसाईट, Centralbankofindia.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यासाठी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये आणि इतर सर्व श्रेणींसाठी ८५० रुपये शुल्क भरावे लागेल. या शुल्कासोबतच १८ टक्के जीएसटी स्वतंत्रपणे भरावा लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DQFUjp
via nmkadda