Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ३०, २०२१ WIB
Last Updated 2021-11-30T11:44:24Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE दहावीच्या टर्म १ एसएसटी पेपरची उत्तरतालिका जाहीर Rojgar News

Advertisement
Class 10 2021-22 : सीबीएसई बोर्डाकडून दहावी वर्ग टर्म १ पेपर ३० नोव्हेंबरपासून सुरू झाले आहेत. सर्व प्रथम सामाजिक शास्त्र (SST) विषयाची परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा सकाळी ११.३० वाजता सुरू होऊन दुपारी १ वाजता संपली. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic.in वर जाऊन उत्तरतालिका तपासू शकतात. या परीक्षेनंतर उत्तरतालिका पीडीएफ किंवा व्हिडिओ स्वरूपात जाहीर केली जाते. सीबीएसई एसएसटी विषयाची परीक्षा संपली आहे. त्यानंतर सीबीएसईतर्फे दहावीच्या एसएसटी विषयाची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. गुण मोजताना सीबीएसई बोर्डाने दिलेल्या मार्किंग स्कीमनुसार बरोबर उत्तरासाठी गुण जोडावे लागतील. उत्तरतालिका अशी तपासा सर्वप्रथम सीबीएसई cbseacademic.nic.inच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या होमपेजवरील प्रश्नपत्रिका टॅबवर जा. सीबीएसई दहावीची सामाजिक विज्ञान प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका शोधा. सीबीएसई इयत्ता दहावी सामाजिक विज्ञान टर्म १ ची उत्तरतालिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असेल. 'सीबीएसई इयत्ता दहावी सामाजिक विज्ञान टर्म १ उत्तरतालिका २०२१-२२' डाउनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी सीबीएसई वर्ग दहावीची उत्तरतालिका २०२१-२२ ची प्रिंटआउट घ्या. ९० मिनिटांचा वेळ विद्यार्थ्यांना ९० मिनिटांत ५० प्रश्न सोडवायचे होते. काठीण्य पातळी लक्षात घेता २५ ते ३० प्रश्न सोपे होते. १५ मध्यम कठीण होते. विद्यार्थ्याला पेपरमध्ये २० गुण मिळायला हवेत. मात्र ४० गुण मिळवणे थोडे कठीण जाईल. १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या बहुपर्यायी निवडीवर आधारित परीक्षेला बसले होते. ICSE परीक्षा सुरू काऊन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) दहावीची परीक्षाही सोमवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी इंग्रजी भाषेच्या पेपरची परीक्षा घेण्यात आली, ज्यामध्ये १४ शाळांमधील सुमारे १४०० विद्यार्थी बसले होते. त्याचबरोबर आयसीएसई बारावीची परीक्षा देखील २२ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. महत्वाचे निर्देश सीबीएसईने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी दहावी आणि बारावीच्या टर्म-१ परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना OMR (ऑप्टिकल मार्क रिकग्निशन) शीट समजावून सांगण्याचे निर्देश बोर्डाने दिले आहेत. सीबीएसईच्या नोटिसमधील माहितीनुसार, पहिल्यांदाच दहावी आणि बारावीच्या मूल्यांकनासाठी ओएमआर पद्धतीचा वापर करणार आहे. त्यामुळे परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी आणि शाळांना ओएमआर बद्दल पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. ओएमआर शीट नीट समजावी यासाठी शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सराव सत्र आयोजित करण्याचा सल्ला बोर्डातर्फे देण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर बोर्डातर्फे पहिल्यांदाच दोन टप्प्यात परीक्षा घेतली जात आहे. सीबीएसई टर्म १ परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची असेल म्हणजे प्रश्नपत्रिकेत बहुपर्यायी प्रश्न असतील. तर टर्म-२ थीमॅटिक पद्धतीने होईल. दोन्ही परीक्षांमध्ये ५०-५० टक्के अभ्यासक्रम असणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3I5iskW
Source https://ift.tt/310mqee