Constitution Day 2021: २६ नोव्हेंबरला संविधान दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास Rojgar News

Constitution Day 2021: २६ नोव्हेंबरला संविधान दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास Rojgar News

2021: २६ नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. या दिवशी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने औपचारिकपणे संविधान स्वीकारले. हे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे. आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो. संविधानाची गरज का ? देशावर १५० राज्य करुन ब्रिटीश राजवट मावळत होती. अशावेळी देशात राहणाऱ्या सर्व धर्मीयांमध्ये एकता, समानता टिकवून ठेवेल अशा संविधानाची भारताला गरज होती. देश एकसंध व्हावा आणि जनतेमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्व हक्क मिळावेत याचा विचार सुरु होता. देश स्वतंत्र होत असताना संविधान सभेच्या स्थापनेची मागणी जोर धरू लागली. या विधानसभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली. संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत २०७ सदस्य उपस्थित होते. संविधान सभा स्थापन झाली तेव्हा या विधानसभेत ३८९ सदस्य होते पण नंतर त्यांची संख्या २९९ पर्यंत कमी झाली. स्वातंत्र्यानंतर देशाची फाळणी झाली तेव्हा काही संस्थानं या विधानसभेचा भाग नव्हती आणि त्यामुळे सदस्य संख्यादेखील कमी झाली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FPyCxc
via nmkadda

0 Response to "Constitution Day 2021: २६ नोव्हेंबरला संविधान दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel