Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ६ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-11-06T11:43:56Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CSEET २०२१ देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट Rojgar News

Advertisement
2021: कंपनी सेक्रेटरीज एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट () मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. ही परीक्षा १३ नोव्हेंबर २०२१ रोजी रिमोट प्रोक्टेड माध्यमातून होणार आहे. आपल्या घरी काहून किंवा तुमच्या सोयीनुसार कुठुनही परीक्षा देता येऊ शकणार आहे. लॅपटॉप आणि डेस्कटॉपद्वारे परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय मोबाइल किंवा टॅबसारखे कोणतेही उपकरण परीक्षेवेळी वापरता येणार नाही सीएसईईटी २०२१ परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न (MCQ) प्रश्न विचारले जाणार आहेत. परीक्षेसाठी १२० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. सीएसईईटी २०२१ चे बिझनेस कम्युनिकेशन, लीगल अॅप्टीट्यूड अॅण्ड लॉजिकल रिजनिंग, इकोनॉमिक्स अॅण्ड बिझनेस एन्व्हायर्न्मेंट, करंट अफेअर्स सेक्शन आणि प्रेझेंटेशन अॅण्ड कम्युनिकेशन स्किल्स हे चार पेपर असणार आहेत. या प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येकी ५० गुणांचे ३५ प्रश्न असतील. एकूण २०० गुणांची ही परीक्षा आहे. CSEET 2021 साठी रिमोट प्रोक्टेड माध्यमातून बसताना उमेदवाराकडे प्रवेशपत्र आणि फोटो ओळखपत्र असावे. पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, यूआयडी आधार कार्ड, मतदार कार्ड हीच कागदपत्रे वैध मानली जातील. उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे पुस्तक, अभ्यासाचे साहित्य, नोट्स, मोबाईल फोन, हेडफोन, इअरफोन, पेजर, डिजिटल डायरी, कॅल्क्युलेटर, ब्लूटूथ डिव्हाइस, लॅपटॉप, पामटॉप, स्मार्ट घड्याळ सोबत बाळगता येणार नाही. बँड किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा गॅझेट देखील वापरता येणार नाही. परीक्षेसाठी उमेदवारांना पेन किंवा पेन्सिल आणि कागद वापरण्याची देखील परवानगी नाही. उमेदवारांनी टेस्ट सुरू होण्याच्या ३० मिनिटे आधी चाचणी पोर्टलवर लॉगिन करणे आवश्यक आहे. टेस्ट सुरू झाल्याच्या १५ मिनिटांनंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षेला बसू दिले जाणार नाही. टेस्ट सुरू झाल्यापासून ९० मिनिटांपर्यंत कोणत्याही उमेदवाराला टेस्ट संपविण्याची परवानगी दिली जाणार नाही. परीक्षेला बसण्याआधी उमेदवार साधारण १ तासाच्या मॉक टेस्टचा प्रयत्न करू शकतात. नोव्हेंबर २०२१ सत्रासाठी मॉक टेस्ट ९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सीएसईईटी २०२१ मध्ये पात्र होण्यासाठी, अर्जदारांना चारही पेपरमध्ये किमान ४० टक्के गुण आणि एकूण ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. चुकीच्या उत्तरांसाठी निगेटीव्ह मार्किंग नसेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CQKxJV
via nmkadda