TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

CTET परीक्षेचा फॉर्म भरलेल्या लाखो उमेदवारांना प्रवेशपत्र कधी? वाचा... Rojgar News

CBSE Admit Card 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET) डिसेंबर २०२१ देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. ही परीक्षा १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत होणार आहे. या परीक्षांचे प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. सीबीएसई परीक्षेसाठी प्रवेशपत्र लवकरच जाहीर केले जाणार आहे. प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. CTET 2021: असे करा डाऊनलोड CBSE CTET परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर लॉगिन करा. त्यानंतर होमपेजवरील 'CTET December Admit Card' लिंकवर क्लिक करा. तुमचा CTET नोंदणी क्रमांक / अर्ज क्रमांक आणि इतर क्रेडेन्शियल भरा. ते सबमिट केल्यानंतर, तुमचे CBSE CTET २०२१ प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा. CTET पेपर १ उत्तीर्ण झालेले उमेदवार इयत्ता पहिली ते पाचवीला शिकवण्यास पात्र असतात. तर CTET पेपर २ उत्तीर्ण झालेले उमेदवार सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकविण्यासाठी पात्र ठरतात. उमेदवारांना अधिकृत पोर्टलवरून प्रवेशपत्र डाउनलोड करावे लागेल. CTET ऑनलाइन (कॉम्प्युटर आधारित - CBT) माध्यमातून घेण्यात येणार आहे. आतापर्यंत ही परीक्षा ऑफलाइन माध्यमातून घेतली जात होती मात्र आता ती ऑनलाइन घेतली जात आहे. या परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, अर्जदारास भेट द्यावी लागेल. पेपरसाठी शुल्क सीबीएसईद्वारे परीक्षमध्ये दोन पेपर घेतले जातात. पहिली ते पाचवीच्या इयत्तांचे शिक्षक होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना पेपर १ मध्ये, तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी उमेदवारांना पेपर २ मध्ये उपस्थित राहावे लागेल. CTET २०२१ च्या नोटीसनुसार, एका पेपरसाठी (पहिली किंवा दुसरी) परीक्षा फी १००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर दोन्ही पेपरसाठी एकूण १२०० रुपये भरावे लागतील. एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी दोन्ही पेपरची फी फक्त ६०० रुपये आहे. CTET परीक्षा १६ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान होणार आहे.सीबीएसईने जाहीर केलेल्या सीटीईटी २०२१ माहिती बुलेटिन आणि १७ सप्टेंबर २०२१ च्या नोटिसनुसार, सीटीईटी डिसेंबर २०२१ परीक्षा १६ डिसेंबर ते १३ जानेवारी २०२२ दरम्यान वेगवेगळ्या तारखांना घेण्यात येणार आहे. बोर्डाद्वारे उमेदवारांना दिलेल्या CET २०२१ प्रवेशपत्रावर परीक्षेची तारीख आणि वेळेबद्दल माहिती मिळेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HrPpI8
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या