TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

DRDO मध्ये विविध पदांची भरती, पदभरतीचा तपशील जाणून घ्या Rojgar News

Apprentice : सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स (DRDO)मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी DRDO तर्फे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अंतिम मुदत यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. DRDO ने अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. याअंतर्गत एकूण ३४ पदे भरली जाणार आहेत. जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार ग्रॅज्युएट अप्रेंटिसची ३३ पदे आणि टेक्निकल डिप्लोमा अप्रेंटिसशिपचे एक पद भरले जाणार आहे. पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी drdo.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. DRDO Recruitment 2021: अशी होईल निवड पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे शॉर्टलिस्टिंग करुन उमेदवारांची निवड केली जाणार आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांचा तपशील DRDO वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार DRDO च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. १० डिसेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदांसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्या अर्ज बाद करण्यात येईल. स्टाफ सिलेक्शन भरतीसाठी रिक्त जागा वाढल्या स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे दरवर्षी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांतर्गत संस्थांमधील विविध ट्रेडमधील ज्युनिअर इंजिनीअर (JE) पदांवर भरतीसाठी निवड प्रक्रिया आयोजित केली जाते. सध्या २०१९ च्या एसएससी जेई परीक्षेची निवड प्रक्रिया सुरू आहे. त्याअंतर्गत ज्युनिअर इंजिनीअरच्या ११५० जागा भरल्या जाणार आहेत. याआधी या पदभरती अंतर्गत ८८७ जागा भरण्यात येणार होत्या. आता ही संख्या वाढवून ११५० इतकी करण्यात आली आहे. आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार याचा अंतिम निकाल ३१ जानेवारी २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे. कर्मचारी निवड आयोगाने ज्युनिअर इंजिनीअर(सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि क्वांटिटी सर्व्हेइंग आणि कॉन्ट्रॅक्ट्स) परीक्षा २०१९ द्वारे भरल्या जाणार्‍या रिक्त पदांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी स्टाफ सिलेक्शनने यासंदर्भात सूचना जाहीर केली. नव्या जेई २०१९ परीक्षेद्वारे ११५० रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यापूर्वी आयोगाने १९ ऑक्टोबर २०२० रोजी नोटीस जाहीरद्वारे एसएससी जेई २०१९ परीक्षेद्वारे ८८७ रिक्त जागा भरणार असल्याचे जाहीर केले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Hw9oW4
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या