Advertisement

GATE 2022: परीक्षा फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्यासाठी १२ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT खरगपूर) गेट २०२२ अर्जातील दुरुस्तीसाठी दुरुस्ती विंडो बंद करणार आहे. ज्या उमेदवारांना अर्जाच्या फॉर्ममध्ये त्यांच्या वर्गात, विषयाचा पेपर, परीक्षेचे शहर किंवा इतर विभागात बदल करायचे आहेत ते बदल करू शकतात. गेट अर्जाच्या फॉर्ममध्ये दुरुस्त्या करण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या परीक्षेचे आयोजन करणाऱ्या आयआयटी खरगपूरने ४ परीक्षा केंद्रांची शहरे काढून टाकली आहेत. सोनेपत, पानिपत आणि इडुक्की अशी तीन ठिकाणची परीक्षा केंद्रे यंदा असणार नाहीत. यानुसार उमेदवारांना त्यांच्या अर्जात दुरुस्ती करण्यास सांगितली आहे. उमेदवार या परीक्षा केंद्रांच्या शहरात कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय बदल करू शकणार आहेत.ही परीक्षा केंद्रांची शहरे यादीतून का वगळण्यात आली त्याबाबतचे कोणतेही कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्रांच्या पसंतीक्रमात यानुसार बदल करण्यास सांगण्यात आला आहे. अर्ज दुरुस्ती विंडो बंद होण्याआधी उमेदवारांनी परीक्षा केंद्रांच्या शहरांमध्ये बदल करायचा आहे. हा बदल करण्यास १२ नोव्हेंबरपर्यंतचा अवधी आहे. आयआयटी खरगपूरच्या नियमांनुसार, उमेदवार पुढील माहितीत बदल करू शकतात - नाव, जन्मतारीख, लिंग, प्रवर्ग, पेपर आणि अन्य तपशील यात दुरुस्ती करू शकतात. Correction Window: अशी करा सुधारणा अर्जातील दुरुस्तीसाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट iitkgp.ac.in ला भेट द्या. आता नावनोंदणी क्रमांक, ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिनवर क्लिक करा. त्यानंतर आधीच भरलेल्या अर्जावरील माहिती दुरुस्त करा. आता आवश्यक शुल्क भरा आणि 'सबमिट' टॅबवर क्लिक करा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या. सुधारणा विंडो १ नोव्हेंबर २०२१ रोजी उघडण्यात आली होती. परीक्षेचे प्रवेशपत्र ३ जानेवारी २०२२ रोजी जाहीर केले जाणार आहे. तर परीक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ५,६,१२ जानेवारी आणि १२ जानेवारी २०२२ रोजी घेतली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3C7g49d
via nmkadda