TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Government job: HAL मध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्याअंतर्गत स्टाफ नर्स, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट आणि ड्रेसर या पदांवर भरती केली जाणार आहे. यासंदर्भात HAL कडून अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार, अर्जाची शेवटची तारीक याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेतून केली जाणार आहे. महत्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - २४ नोव्हेंबर २०२१ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १४ डिसेंबर २०२१ रिक्त जागांचा तपशील स्टाफ नर्स- ०७ जागा मानसोपचारतज्ज्ञ - ०१ जागा फार्मासिस्ट- ०१ जागा ड्रेसर- ०१ जागा शैक्षणिक पात्रता स्टाफ नर्सच्या पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून जनरल नर्सिंग आणि डिप्लोमासह पीयूसी असणे आवश्यक आहे. तर सायकोथेरपिस्टच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे फिजिओथेरपीमध्ये डिप्लोमा (२ वर्षे) सह पीयूसी असणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क या पदांसाठी अर्ज करणाऱ्या यूआर/ओबीसी उमेदवारांना २०० रुपये शुल्क भरावे लागेल. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही. पदासाठी लागणाऱ्या वयोमर्यादेचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट hal-india.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. १४ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आलेला अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lcNu0A
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या