TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

ICSE टर्म १ परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी Rojgar News

ISC Semester-1: टर्म १ परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. काऊन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (ICSE) ने ISC सेमिस्टर १ च्या परीक्षेबाबत एक मोठी घोषणा केली असून गणिताचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेत हा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार गणिताचा पेपर अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्याचे ICSE ने आपल्या अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे. शैक्षणिक सत्र २०२१-२२ च्या आयएससी गणित विषयासंदर्भात घोषणा करताना बोर्डाने सुधारित तारीख देखील जाहीर केली आहे. आता आयएससी सेमिस्टर १ गणित विषयाची परीक्षा रसायनशास्त्र (पेपर-१) थिअरी परीक्षेच्या एक दिवस आधी १२ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. या संदर्भात आयसीएसईने जाहीर केलेल्या अधिकृत नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आयएससी वर्ष २०२१-२२ च्या सेमिस्टर १ गणिताची परीक्षा २९ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी २ वाजता होणार होती. दरम्यान आयसीएसईतर्फे पेपर पुढे ढकलण्यामागचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही. आता ही परीक्षा रविवार १२ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी २ वाजता घेतली जाईल. प्रत्येक उमेदवाराला सेमिस्टर १ आणि सेमिस्टर २ या दोन्ही परीक्षांना बसावे लागेल. यंदा प्रथमच बोर्डाच्या परीक्षा दोन सेमिस्टरमध्ये विभागल्या जात आहेत. दुसरीकडे, अंतिम निकाल स्पष्ट करण्यासाठी उमेदवारांना या दोन्ही परीक्षांना बसावे लागेल. दरम्यान, इंडियन स्कूल सर्टिफिकेट (ISC) इयत्ता बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी येत्या वर्षात मोठा दिलासा जाहीर करण्यात आला आहे. काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) ने त्यांना त्यांच्या सेमिस्टर १ च्या परीक्षेदरम्यान सायन्टिफिक कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी दिली आहे. टर्म १ च्या परीक्षेसाठी डिजीटल मार्कशीट इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (ISCE) द्वारे दहावी आणि बारावीसाठी घेण्यात आलेल्या टर्म १ च्या परीक्षेच्या सूचना आणि निकालासंदर्भातील अपडेट जाहीर करण्यात आली आहे. काऊन्सिलने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना टर्म परीक्षांच्या निकालासोबतच डिजीटल मार्कशीट जाहीर केली जाणार आहे. महत्वाच्या सूचना विद्यार्थ्यांना परीक्षा वेळेच्या किमान १० ते १५ मिनिटे आधी पोहोचणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि प्रश्नपत्रिकेवर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. विद्यार्थ्‍यांनी प्रश्‍नपत्रिकेसह उत्‍तरपत्रिकेच्‍या वरच्‍या विशिष्‍ट जागेवर त्‍यांचा युनिक आयडी आणि इंडेक्स नंबर लिहावा लागेल विद्यार्थ्यांनी उत्तरपुस्तिकेवर उत्तरपत्रिकेच्या वरच्या शीट व्यतिरिक्त कुठेही काही लिहू नये. जे विद्यार्थी परीक्षेच्या ठिकाणी उशिरा पोहोचतील त्यांना पर्यवेक्षक परीक्षकांना समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे लागेल. विद्यार्थ्यांनी मास्क घालावे. हात स्वच्छ करावेत. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. आयसीएसईने करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यानंतर विशिष्ट सूत्रानुसार, मूल्यांकन करत विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला होता. २४ जुलै रोजी बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला. यावर्षी ICSE म्हणजेच दहावीचा निकाल ९९.९८ टक्के होता. ISC म्हणजेच बारावीच्या निकालाची उत्तीर्णता ९९.७६ टक्के होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3riUCMz
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या