Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-11-27T12:43:25Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ICSE Term 1 Exam: बारावीची परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट Rojgar News

Advertisement
ICSEE Update: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (Council for the Indian School Certificate Examinations, CISCE)ICSE म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या परीक्षांसंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सेमिस्टर १ च्या परीक्षेदरम्यान सायंटिफिक कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. बोर्डाने २४ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या नोटिफिकेशनमध्ये याबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार बारावी वर्ष २०२१-२२ सेमिस्टर १ परीक्षेच्या संदर्भात आहे. उमेदवारांना Casio FX- 82 MS (सायंटिफिक कॅल्क्युलेटर) कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर १ ची परीक्षा २२ नोव्हेंबरपासून सुरू झाली आणि २० डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १० मिनिटे दिली जाणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देण्यात येईल. सेमिस्टर परीक्षा MCQ स्वरूपात घेतली जाईल. प्रत्येक उमेदवाराला सेमिस्टर १ आणि सेमिस्टर २ या दोन्ही परीक्षांना बसावे लागेल. यंदा प्रथमच बोर्डाच्या परीक्षा दोन सेमिस्टरमध्ये विभागल्या जात आहेत. उमेदवारांना या दोन्ही परीक्षांना बसावे लागेल. दुसऱ्या सत्राची परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये होणार आहे. ISC ची पहिल्या सत्राची परीक्षा आता सुरू आहे तर दुसऱ्या सत्राची परीक्षा पुढील वर्षी मार्च/एप्रिलमध्ये होणार आहे. सेमिस्टर १ मध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQs) प्रश्न विचारले जातील. ज्यामध्ये उमेदवारांना प्रश्नपत्रिका-सह-उत्तर पुस्तिका दिल्या जातील. विद्यार्थ्यांना या पुस्तिकांवरच उत्तरे लिहावी लागणार आहेत. सर्व प्रश्नांशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे ICSe पेपरच्या पुस्तिकेवरच दिली जातील. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू करण्यापूर्वी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. परीक्षा सुरू झाल्यावर, उमेदवारांना पत्रकावर त्यांचा ओळख क्रमांक आणि अनुक्रमणिका क्रमांक लिहावा लागेल. महत्वाच्या सूचना विद्यार्थ्यांना परीक्षा वेळेच्या किमान १० ते १५ मिनिटे आधी पोहोचणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि प्रश्नपत्रिकेवर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. विद्यार्थ्‍यांनी प्रश्‍नपत्रिकेसह उत्‍तरपत्रिकेच्‍या वरच्‍या विशिष्‍ट जागेवर त्‍यांचा युनिक आयडी आणि इंडेक्स नंबर लिहावा लागेल. विद्यार्थ्यांनी उत्तरपुस्तिकेवर उत्तरपत्रिकेच्या वरच्या शीट व्यतिरिक्त कुठेही काही लिहू नये. जे विद्यार्थी परीक्षेच्या ठिकाणी उशिरा पोहोचतील त्यांना पर्यवेक्षक परीक्षकांना समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे लागेल. विद्यार्थ्यांनी मास्क घालावे. हात स्वच्छ करावेत. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. टर्म १ च्या परीक्षेसाठी डिजीटल मार्कशीट इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (ISCE) द्वारे दहावी आणि बारावीसाठी घेण्यात आलेल्या टर्म १ च्या परीक्षेच्या सूचना आणि निकालासंदर्भातील अपडेट जाहीर करण्यात आली आहे. काऊन्सिलने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना टर्म परीक्षांच्या निकालासोबतच डिजीटल मार्कशीट जाहीर केली जाणार आहे. आयसीएसईने करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यानंतर विशिष्ट सूत्रानुसार, मूल्यांकन करत विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला होता. २४ जुलै रोजी आयसीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला. यावर्षी ICSE म्हणजेच दहावीचा निकाल ९९.९८ टक्के होता. ISC म्हणजेच बारावीच्या निकालाची उत्तीर्णता ९९.७६ टक्के होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30YkrqR
Source https://ift.tt/310mqee