Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १३, २०२१ WIB
Last Updated 2021-11-13T06:44:33Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IIT Delhi च्या जागतिक क्रमवारीतील घसरणीमागचे संचालकांनी सांगितले कारण Rojgar News

Advertisement
IIT's : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी () दिल्ली संस्थेने इंजिनीअरिंग आणि टेक्नोलॉजीमधील जगातील टॉप २०० संस्थांमधील आपले स्थान कायम ठेवले आहे. पण या संस्थेला क्यूएस आणि टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग सारख्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत कोणतेही टॉपचे स्थान मिळू शकले नाही. दिल्लीच्या संचालकांनी यामागचे कारण स्पष्ट केले आहे. आयआयटी केवळ इंजिनीअरिंगवर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रमवारीत ते आपले स्थान गमावत असल्याचे स्पष्टीकरण आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही रामगोपाल राव यांनी दिले. 'आम्ही इंजिनीअरिंग आणि तंत्रज्ञानात आमची क्रमवारी सुधारत आहोत. परंतु जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत टॉपच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी आम्हाला अजून थोडा वेळ लागेल. आम्ही इतर परदेशी विद्यापीठांच्या विशेषत: यूएस विद्यापीठाच्या तुलनेत पुरेसे व्यापक नाही, हे यामागचे मुख्य कारण असल्याचे राव यावेळी म्हणाले. 'जर आपण स्टॅनफोर्डशी आयआयटीची तुलना केली तर आयआयटी दिल्लीचा क्रमांक मागे असू शकतो. कारण यूएस युनिव्हर्सिटीमध्ये लॉ, मेडिसिन अशा अनेक शाळा आहेत. आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये उच्च स्थान मिळविण्यासाठी आंतरविद्याशाखीय शिक्षणाला (interdisciplinary education) प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शिक्षणासाठी आंतरविद्याशाखीय मार्गाचा अवलंब करण्याच्या प्रयत्नात, संस्थेने गेल्या सहा वर्षांत १० शैक्षणिक युनिट्स सुरू केल्या आहेत. आयआयटी दिल्लीने या वर्षी पाच नवीन बीटेक प्रोग्राम, आठ एमटेक डिग्री, २ एमएससी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. पुढील वर्षापासून आयआयटी दिल्लीतर्फे डिझाइनमध्ये बॅचलर प्रोग्राम देखील सुरू केला जाणार आहे. 'पुढील काही वर्षांत बीटेक इन डिझाइन पदवी देखील सुरू केली जाईल, असे राव म्हणाले. वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंगमध्ये ३ भारतीय विद्यापीठांचा टॉप ४०० मध्ये समावेश बेंगळुर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) यासह तीन भारतीय विद्यापीठांनी टाइम्स हायर एज्युकेशन (THE) वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२२ मध्ये टॉप ४०० सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे. कोणालाही २०० ग्लोबल लीग टेबलमध्ये स्थान मिळाले नाही. IISc ला गेल्या वर्षीप्रमाणे ३०१ ते ३५० या गटात स्थान मिळाले. भारतीय औद्योगिक संस्था रोपडने ३५१ ते ४०० च्या गटात आपले स्थान कायम राखले आहे. त्याचवेळी, म्हैसूर येथील खासगी विद्यापीठ जेएसएस अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चने जागतिक क्रमवारीत पदार्पण केले आणि ३५१ ते ४०० च्या गटात स्थान मिळवले. आयआयटी इंदूरला ४०१ ते ५०० गटात स्थान मिळाले आहे. अलगप्पा विद्यापीठ आणि थापर विद्यापीठ ५०१ ते ६०० या गटात आहेत. यादीतील पहिल्या २०० संस्थांना वैयक्तिक रँकिंग क्रमांक दिले जातात आणि उर्वरित संस्था गटांमध्ये सूचीबद्ध केले जातात. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठ (DTU), जामिया मिलिया इस्लामिया आणि पंजाब विद्यापीठ यासह दहा भारतीय विद्यापीठांना ६०१ ते ८०० गटामध्ये आहेत. तर दिल्ली विद्यापीठ ८०० ते १०० बँडवर घसरले आहे. जे मागील वर्षी ६०१ ते ८०० च्या रँकिंगपेक्षा खाली होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3osYVlu
via nmkadda