Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २४, २०२१ WIB
Last Updated 2021-11-24T10:43:20Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

MHT CET 2021: पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी कधी? जाणून घ्या... Rojgar News

Advertisement
महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (Maharashtra Common Entrance Test Cell)सीईटीची पहिल्या फेरीतील प्रवेशांची गुणवत्ता यादी () बुधवार २४ नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी या यादीबाबतच्या त्यांच्या हरकती वा तक्रारी २५ ते २७ नोव्हेंबर पर्यंत नोंदवू शकतात. ही गुणवत्ता यादी सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. ही यादी जाहीर झाल्यावर विद्यार्थी ती या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. दरम्यान, इंजिनीअरिंगच्या काही अभ्यासक्रमांना मागणी वाढली आहे. डेटा सायन्स आणि आर्टिफशिअल इंटेलिजन्ससारख्या शाखांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत नोंदणीत १५ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी ९६,३३७ अर्ज आले होते. अंतिम गुणवत्ता यादी आणि प्रवर्गनिहाय प्रोव्हिजनल अलॉटमेंट २८ नोव्हेंबर २०२१ रोजी जारी केली जाईल. यंदा इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी एकूण नोंदणी १.१ लाख रुपये इतकी झाली आहे. दुसरीकडे, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या रिक्त जागा मागील वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. पहिल्या फेरीची MHT 2021 कशी डाऊनलोड करायची ते स्टेप बाय स्टेप पद्धतीने पुढीलप्रमाणे समजवण्यात आले आहे. MHT CET Merit List 2021 कशी करायची गुणवत्ता यादी डाऊनलोड? - महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ cetcell.mahacet.org वर जा. - आता होमपेजवरील 'Undergraduate Courses’सेक्शनमध्ये जा आणि ‘B.Tech/B.E’ पर्याय निवडा. - आता एक नवी विंडो उघडेल. तेथे ‘MHT CET Provisional Merit List 2021’(हा पर्याय निवडा. हा पर्याय लवकरच अॅक्टिवेट होईल) - गुणवत्ता यादी पाहा आणि डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊट घेऊन ठेवा. नवे कोर्स कोणते? काही महाविद्यालये नवनवीन अभ्यासक्रम सुरू करत आहेत. यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, सायबर सिक्युरिटी आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आदींचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nLxeVS
via nmkadda