Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ३०, २०२१ WIB
Last Updated 2021-11-30T11:44:30Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Music मध्ये रस असेल तर भारतीय नौदलात नोकरीची संधी, ६९ हजारपर्यंत मिळेल पगार Rojgar News

Advertisement
Career in Music: तुम्हाला असलेली संगीताची ) आवड तुमचे कमावण्याचे साधन बनू शकते. म्युसिकची आवड असलेले तरुण नौदलात संगीतकार नाविक (Musician Sailor) म्हणून आपले करिअर करू शकतात. हायस्कूल पास असलेले, संगीताची चांगली समज आणि अविवाहित तरुणांना भारतीय नौदलात संगीतकार खलाशी होण्याची संधी मिळू शकते. या पदासाठी वेळोवेळी भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांच्या आधारे अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतीय नौदल संगीत जाणकार तरुणांना संगीतकार अधिकारी बनण्याची संधी देते. निवडलेल्या उमेदवारांना सर्वोत्तम प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षित संगीतकार खलाशी देश-विदेशातील मैफिली आणि सिम्फोनिक बँड मैफिलींमध्ये भाग घेतात. पात्रता निकष संगीतकार नाविक होण्यासाठी, एखाद्याने कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवाराला संगीताचे चांगले ज्ञान असावे आणि त्याला विविध प्रकारची वाद्ये वाजवता यावीत. पाश्चात्य आणि भारतीय दोन्ही वाद्यांसह संगीताचे विशेष ज्ञान आणि कोणतेही वाद्य वाजवण्याचे व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १७ ते २० वर्षे आहे. विशेष परिस्थितीत गुणवंत उमेदवारांना वयात सवलत दिली जाऊ शकते. :उमेदवाराची किमान उंची १५७ सेमी असावी आणि वजन त्याच प्रमाणात असावे. छातीचा विस्तार ५ सेमी असावा. या पदासाठी केवळ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी उमेदवारच पात्र मानले जातात. पगार किती मिळेल? प्रशिक्षणादरम्यान, उमेदवारांना दरमहा १४ हजार ६०० रुपये स्टायपेंड म्हणून दिले जातील. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना संरक्षण वेतन स्केलनुसार २१,७०० ते ६९,१०० रुपये पगार दिला जातो. तसेच नियमानुसार दरमहा डीए दिला जातो. संगीत क्षमता चाचणी उमेदवाराला संगीतासाठी ओरल अ‍ॅप्टिट्यूडमध्ये टेम्पो, पिच आणि संपूर्ण गाणे गाऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराला कोणतेही भारतीय किंवा पाश्चात्य वाद्य वाजवता आले पाहिजे. उमेदवाराला देशी-विदेशी संगीताची मूलभूत तत्त्वे माहित असणे आवश्यक आहे. शिवाय संगीत वाद्य ट्यून करणे, अज्ञात संगीताच्या नोट्स वाद्यांशी जोडणे याची माहिती असणे अनिवार्य आहे. फिजिकल फिटनेस (PFT) भारतीय नौदलातील संगीतकार खलाशांच्या निवडीसाठी शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT) देखील घेतली जाते. PFT मध्ये ७ मिनिटांत १.६ किमी धावणे, २० स्क्वॅट्स आणि १० पुश-अप असतात. अधिक तपशीलांसाठी वेळोवेळी जाहीर केलेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3o6NvoM
Source https://ift.tt/310mqee