Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ११, २०२१ WIB
Last Updated 2021-11-11T07:43:20Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NAS: कसे असेल राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण? जाणून घ्या तपशील Rojgar News

Advertisement
National Achievement : नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग (NCERT)तर्फे सरकारी आणि खासगी शाळांमध्ये (National Assessment Survey, NAS) केले जाते. या माध्यमातून ७०० हून अधिक जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचे लर्निंग स्किल्स पाहून करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या अभ्यासक्रमाची गरज आहे? याची पाहणी केली जाणार आहे. नोव्हेंबरमध्ये शाळांमध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण केले जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली होती. हे सर्व्हेक्षण सरकारी, सरकारी मान्यताप्राप्त आणि खासगी संस्थांमध्ये केले जाते. ७३३ जिल्ह्यातील १.२३ लाख शाळांमधील ३८ लाखांहून अधिक विद्यार्थी NAS मध्ये सहभागी होत असल्याची माहिती शिक्षणविभागाने दिली आहे. याआधी २०१७ मध्ये हे सर्व्हेक्षण झाले होते. त्यानंतर २०२० मध्ये पुढी सर्व्हेक्षण होणार होते. पण करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व्हेक्षण नोव्हेंबर २०२१ मध्ये होत आहे. या विषयांसाठी सर्व्हेक्षण NAS द्वारे दर तीन वर्षांनी तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे मुल्यांकन केले जाते.NCERT तर्फे नॅशनल सॅम्पल सर्व्हे (NSS) च्या माध्यमातून ही माहिती गोळा केली जाते. तिसरी आणि पाचवीच्या गणित आणि ईव्हीएस, आठवीसाठी गणित, विज्ञान आणि नागरिकशास्त्र तसेच दहावीसाठी गणित, विज्ञान, नागरिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांसाठी हे सर्व्हेक्षण होणार असल्याची माहिती शिक्षणविभागाने दिली. २२ भाषांमधून चाचणी ही चाचणी २२ भाषांमधून होणार आहे. यामध्ये मराठी, आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मणिपुरी, मिझो, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलुगू, उर्दू, बोरो, गाडो, खासी, कोकणी, नेपाळी, भूतिया आणि लेप्चा या भाषांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांची नेमणूक हे सर्व्हेक्षण सुरळीत पार पडावे यासाठी १.८ लाख संशोधक, १.२३ लाख निरीक्षक, ७३३ जिल्हा समन्वयक आणि जिल्हा नोडल ऑफिसर, ३६ राज्य नोडल ऑफिसर यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच या सर्व्हेक्षणासाठी पोर्टल स्थापन करण्यात आले आहे. या सर्व्हेक्षणातून आलेले राज्य आणि जिल्ह्यांचे रिपोर्ट कार्ड सार्वजनिक केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3C6t7YH
via nmkadda