Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-11-02T13:43:52Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NHAI Recruitment: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती, पदवीधरांना संधी Rojgar News

Advertisement
NHAI : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा ( of India, NHAI) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत (NHAI) ने भरतीसंदर्भात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. डेप्युटी मॅनेजर (फायनान्स आणि अकाऊंट्स) (Deputy Manager (Finance and Accounts)आणि डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) या पदांच्या भरतीसाठी दोन स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिरातींनुसार एकूण ९० पदांसाठी भरती केली जाणार आहे. डेप्युटी मॅनेजर (फायनान्स आणि अकाऊंट्स) NHAI ने जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार, जाहिरात केलेल्या डेप्युटी मॅनेजर (फायनान्स आणि अकाऊंट्स) पदांपैकी ६ पदे अनारक्षित आहेत. तर ५ पदे ओबीसी ओबीसी (नॉन-क्रिमी लेयर), ३ एससी, १ एसटी आणि २ ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी राखीव आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून कॉमर्स/सीए/ सीएमएमध्ये पदवी असणे गरजेचे आहे. किंवा फायनान्स विषयात एमबीए असणे गरजेचे आहे. याशिवाय उमेदवारांना संबंधित कामाचा ४ वर्षांचा अनुभव असावा. तसेच, अर्जाच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवारांचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) NHAI द्वारे प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या भरतीच्या जाहिरातीनुसार डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदांसाठी जाहिरात केलेल्या ७३ पदांपैकी २७ अनारक्षित आणि २१ ओबीसी-एनसीएल, १३ एससी, ५ एसटी आणि ७ जागा ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी राखीव आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC)आयोजित केली जाणारी भारतीय इंजिनीअरिंग सेवा (IES)आणि २०२० च्या मुलाखती (व्यक्तिमत्व चाचणी) मध्ये सहभागी असणे गरजेचे आहे. इच्छुक उमेदवार NHAI च्या अधिकृत वेबसाइट nhai.gov.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.डेप्युटी मॅनेजर (फायनान्स आणि अकाऊंट्स) पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर आहे आणि डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदांसाठी उमेदवार ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GGAbP9
via nmkadda