TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Omicron Variant Spreading: शाळा सुरू होण्याबाबतचा संभ्रम कायम Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील सर्व १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा () निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र संसर्गाची () भीती उभी ठाकल्याने शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयाचा फेरविचार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातच आरोग्य संचालकांनी शाळा सुरू करताना काय काळजी घ्यायची याबाबत सूचना जाहीर केल्या आहेत. ओमिक्रॉन आणि त्याविषयीची चिंता सर्वत्र पसरली असल्याने राज्यात १ डिसेंबरपासून पहिली ते चौथी आणि सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शाळा सुरू करण्याबाबत मुंबई महापालिकेने सावध भूमिका घेतली आहे. तर, दुसरीकडे राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने शाळा सुरू करण्यासाठी रविवारी मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्याने मुंबईतील शाळांसंदर्भात नेमका निर्णय कधी होणार, याकडे पालकांचे लक्ष आहे. आरोग्य सेवा संचालनालयाने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये राज्यातील सर्व शाळा, जिल्हे, महापालिका, नगरपालिका, छावणी बोर्ड आदी शाळांचा समावेश करण्यात आला आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांत किमान सहा फुटांचे अंतर ठेवणे, मास्क वापरणे, हात धुणे, स्वच्छतेबाबत प्रशिक्षण देणे आदी सूचना यात करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे शिक्षकांच्या लसीकरणावरही भर देण्यात आला आहे. शाळा उघडण्यापूर्वी प्रतिबंधित क्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळांत बोलवू नये, शाळांची संपूर्ण स्वच्छता करून घ्यावी. शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी घेतली जाऊ नये. शाळांमध्ये गर्दी होणार नाही असे कोणतेही खेळ, कार्यक्रम, उपक्रम आयोजित करू नयेत, आदी सूचना करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू झाल्यावर ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत, अशाच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये प्रवेश दिला जावा, ज्या स्कूल बसने मुले येतात, त्यातही गर्दी केली जाऊ नये, करोनामुळे मुलांच्या, शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर कोणतेही परिणाम होणार नाहीत, त्यांना नैराश्य येणार नोही यासाठी समुपदेशनाची व्यवस्था करावी, अशा सूचनादेखील करण्यात आल्या आहेत. विलगीकरणातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी, शाळेत कोणामध्ये करोनाची लक्षणे दिसू लागल्यास त्या व्यक्ती अथवा विद्यार्थ्यांना भेदभावाची वागणूक दिली जाऊ नये, अशा सूचनाही आरोग्य सेवा संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी केल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rj2WMG
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या