बीएमसीमध्ये विविध पदांची भरती, १.२५ लाखांपर्यंत मिळेल पगार Rojgar News

बीएमसीमध्ये विविध पदांची भरती, १.२५ लाखांपर्यंत मिळेल पगार Rojgar News

BMC : मुंबई महानगरपालिकेमध्ये (Brihanmumbai Municipal Corporation, BMC)पुन्हा एकदा भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी पालिकेतर्फे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहे. पालिकेच्या या पदभरतीअंतर्गत कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ (Junior Consultants Anesthetist) आणि कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ डिप्लोमा (Junior Consultants Anesthetist Diploma)पदाच्या एकूण ४ जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे एमडी, डिएनबी,एफसीपीएस किंवा कोणत्याही वैद्यकिय शाखेतून पदव्युत्तर शिक्षण असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराला संबंधित कामाचा किमान ३ वर्षांचा अुभव असणाऱ्या उमेदवारांना भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दीड लाख रुपये पगार दिला जाणार आहे. तर कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ डिप्लोमा पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १ लाख रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला रेझ्युमेसोबत दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो दिलेल्या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे. उमेदवारांनी ही कागदपत्रे डिस्पॅच विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई ४०००२२ या पत्त्यावर २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पाठवायची आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3n0iq5i
via nmkadda

0 Response to "बीएमसीमध्ये विविध पदांची भरती, १.२५ लाखांपर्यंत मिळेल पगार Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel