Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २४, २०२१ WIB
Last Updated 2021-11-24T08:43:19Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

'या' राज्यात निवडणुकीनंतर जाहीर होणार दहावी, बारावीचा निकाल Rojgar News

Advertisement
UP Board Exam 2022: उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाची हायस्कूल आणि इंटरमिजिएट बोर्ड परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे. यूपी बोर्डाअंतर्गत येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा विधानसभा निवडणुकीनंतर घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर हायस्कूल आणि इंटरमिजिएटची पूर्व-बोर्ड परीक्षा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यूपी बोर्ड हायस्कूल आणि इंटरमीडिएट परीक्षा-2022 साठी ५५ लाखांहून अधिक नियमित आणि वैयक्तिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. राज्यात २०१८ पासून फेब्रुवारीमध्ये बोर्डाच्या परीक्षा होत आहेत. पण २०२२ मध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे शाळांमध्ये मतदान केंद्रे उभारणे, शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती यासह प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणाही निवडणुकीत व्यस्त राहणार आहेत. अशा स्थितीत निवडणुकीच्या काळात बोर्डाच्या परीक्षा घेणे शक्य होणार नाही. निवडणुकीनंतरच बोर्डाची परीक्षा घेण्याबाबत सरकारमध्ये एकमत झाले आहे. यानुसार बोर्डाच्या पूर्व परीक्षा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत. निवडणुका आणि परीक्षांचा संबंध काय? फेब्रुवारीमध्ये दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा होणार होत्या. पण विधानसभा निवडणुकाही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार आहेत. यादरम्यान शाळेला मतदान केंद्र बनवण्यात येणार असून, शिक्षकांवर निवडणूक ड्युटीही लावण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वेळीच परीक्षा घेणे शक्य होणार नाही. निवडणुकीच्या तारखा का बदलता येत नाहीत? सध्याच्या सरकारचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपणार आहे. मार्चपूर्वी विधानसभा निवडणुका घेणे आवश्यक आहे. अशा स्थितीत निवडणुकीच्या तारखांना मुदतवाढ देता येणार नाही. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षाच पुढे ढकलण्यात येणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l55NES
via nmkadda