TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

शाळा सुरू, मुलांनी यायचे कसे? स्कूलबस, व्हॅनवरील बंदीमुळे पालक, शाळा चिंतेत Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, नागपूर राज्य सरकारने ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथी आणि शहरी भागात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने स्थानिक प्रशासन, शाळा व्यवस्थापन सज्ज होण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु, स्कूलबस, व्हॅनवरील बंदी कायम असल्यामुळे मुलांनी शाळेत यायचे कसे, असा प्रश्न शाळा आणि पालकांना सतावत आहे. करोनाचे संक्रमण आटोक्यात आहे. शहराचा विचार करता दिवाळीनंतर करोनाची तिसरी लाट येण्याची वर्तविलेली शक्यता खोटी ठरत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने संबंधित निर्णय घेतला. शाळा सुरू होणार असल्याने बहुतांश पालक आणि पाल्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुन्हा एकदा मित्रांच्या गाठीभेटी, शिक्षकांचा प्रत्यक्ष सहवास लाभणार असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारी ठरत आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास अडचणीचा सामना करावा लागणार आहे. याबाबत अधिक सांगताना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यवाह रवींद्र फडणवीस म्हणाले, 'सरकारने स्कूलबस, व्हॅनवरील बंदी कायम ठेवली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास अडचण निर्माण होईल. तसेच एका सीटवर एक व्यक्ती हा इतर बसेससाठी असलेला नियम लागू केल्यास त्याचादेखील त्रास शाळा आणि विद्यार्थ्यांना होईल. एका सीटवर एकच विद्यार्थी बसतोय की नाही, यावर नियंत्रण अशक्य आहे.' केशवनगर उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद भाकरे म्हणाले, 'निर्णयाचा आनंद आहे. पाचवी ते सातवीपर्यंतचे काही विद्यार्थी सायकलने येतात. काहींना पालक सोडून देतात. तर काही विद्यार्थी ऑटो, स्कूलबस, व्हॅनने येतात. यातील बस, व्हॅनने येणाऱ्या मुलांची अडचण झाली आहे. मुख्य म्हणजे पहिली ते चौथीमधील जे विद्यार्थी पूर्णत: स्कूलबसवर अवलंबून आहेत, त्यांना शाळेत येणे अवघड जाईल.' पूर्ण क्षमतेने वर्ग नाहीतच सध्या शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. यापैकी आठवी, नववी आणि अकरावीचे वर्गातील उपस्थिती पन्नास टक्क्यांच्या घरात आहे. बारावीचे विद्यार्थी परीक्षा जवळ येत असल्याने पूर्ण क्षमतेने येत आहेत. तर दहावीचे वर्ग पूर्णत: ऑनलाइनहून ऑफलाइनकडे वळते होण्याच्या मार्गावर आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xqoMi5
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या