इंजिनीअरिंग, एमबीएला नोंदणी वाढली; गुणवत्ता यादीसह प्रवेश फेऱ्यांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष Rojgar News

इंजिनीअरिंग, एमबीएला नोंदणी वाढली; गुणवत्ता यादीसह प्रवेश फेऱ्यांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणीचा आकडा वाढला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने व्यावसायिक अभ्यासक्रमांची नोंदणी स्थिती जाहीर केली. २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकीसह, एमबीए, एमसीए अभ्यासक्रम प्रवेशासाठी नोंदणी वाढली. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी १ लाख ७ हजार ७३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सीईटी सेलतर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील आर्किटेक्चर, अभियांत्रिकी, बीफार्म, एमफार्म, एमआर्च, एमबीए-एमएमएस, एमसीए, एमई-एमटेक, एमफार्मसीसह थेट द्वितीय अभियांत्रिकी, थेट द्वितीय फार्मसी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला. सीईटी निकालानंतर नोंदणीची प्रक्रिया संपली आहे. २०२०-२१ शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत अनेक अभ्यासक्रमासाठी नोंदणी वाढली तर, काही अभ्यासक्रमासाठी नोंदणी कमी आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत मागील वर्षी ९६ हजार ३३७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, यंदा १ लाख ७ हजार ७३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. फार्मसी पदवी अभ्यासक्रमाला मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांची नोंदणी कमी आहे. एमबीए-एमएमएस, एमफार्मसी अभ्यासक्रमाला नोंदणी वाढली आहे. थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, फार्मसीलाही विद्यार्थ्यांचा कल मागील वर्षीच्या तुलनेत अधिक असल्याचे आकडेवारीवरून समोर आले. अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्षासाठी ६९ हजार ४४८ विद्यार्थ्यांनी तर फार्मसीला १२ हजार ३७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अभियांत्रिकी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची तात्पुरती गुणवत्ता यादी बुधवार २४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्याकडेही विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. बारावी निकाल वाढल्याचा परिणाम विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला मागील वर्षीच्या तुलनेत नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीवरून समोर आले. विद्यार्थी नोंदणी वाढण्यामध्ये बारावी निकालही असल्याचे कारण सांगितले जात आहेत. करोनामुळे यंदा बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. संस्थास्तरावर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर शिक्षण मंडळाने निकाल जाहीर केला. राज्यात बारावीचा निकाल ९९ टक्क्यांपेक्षा अधिक राहिला. त्याचा परिणाम असल्याचे सांगण्यात येते. अशी आहे स्थिती... बॅचलर आर्किटेक्चर संस्था ८० प्रवेश क्षमता ४९७७ विद्यार्थ्यांची नोंदणी ३४६५ -- इंजिनअरिंग कॉलेज ३२९ प्रवेश क्षमता १२५५४८ विद्यार्थ्यांची नोंदणी १०७७३२ -- एमबीए-एमएमएस कॉलेज ३१९ प्रवेश क्षमता ३६१३२ विद्यार्थ्यांची नोंदणी ५४२२७ -- एमसीएस कॉलेज ९८ प्रवेश क्षमता ७७२५ विद्यार्थ्यांची नोंदणी १०८५५ -- एम.फार्मसी संस्था १२३ प्रवेश क्षमता ४०४८ विद्यार्थ्यांची नोंदणी ५२७३


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30Waqdy
via nmkadda

0 Response to "इंजिनीअरिंग, एमबीएला नोंदणी वाढली; गुणवत्ता यादीसह प्रवेश फेऱ्यांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel