TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

पुणे विद्यापीठाची सत्र परीक्षा जानेवारीत ऑफलाइन पद्धतीने Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा कायम ठेवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (, ) सत्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याची तयारी केली आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रम, कालावधी बैठक व्यवस्था, पुनर्परीक्षा आदींबाबत चर्चा करून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. पुणे विद्यापीठासोबतच राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या सत्र परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात, की ऑफलाइन याबाबत मतांतरे आहेत. मात्र, परीक्षांचा दर्जा टिकवण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचविण्याच्या दृष्टीने ऑफलाइन परीक्षा झाल्या पाहिजे, असा सूर शिक्षण क्षेत्रातून उमटत आहे. त्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही ऑफलाइन परीक्षा घेण्याचे सूतोवाच काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाकडून जानेवारीत परीक्षा सुरळीत सुरू करण्यासाठी उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणजे परीक्षांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. करोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता परीक्षेचा कालावधी आणि अभ्यासक्रम कमी करणे, बैठक व्यवस्था सुटसुटीत करणे, परीक्षा दिवसभरात दोन सत्रांत घेणे, परीक्षेपासून वंचित राहणाऱ्यांची पुनर्परीक्षा घेणे अशा महत्त्वाच्या तज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात येत आहे. साधारण १५ डिसेंबरच्या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील ऑनलाइन अध्यापन २० ऑक्टोबरपासून ऑफलाइन पद्धतीने सुरू झाले आहे. त्याला विद्यार्थ्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे; प्रात्यक्षिकांचे वर्गही होत आहेत. त्यामुळे ऑफलाइन परीक्षेला कोणतीही अडचण येणार नाही, अशी प्राध्यापकांची भावना आहे. खासगी विद्यापीठांत ऑफलाइन परीक्षा राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष थोड्या उशिराने सुरू झाले असले, तरी त्यांना ऑफलाइन परीक्षा घेण्यात अडचण येणार नाही. काही महाविद्यालयांनी परीक्षांचे वेळापत्रक तयार केले असून, येत्या काही दिवसांत सुरुवातही होणार आहे. खासगी विद्यापीठांतही ऑफलाइन परीक्षा घेण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे परीक्षांबाबत सगळीकडे एकवाक्यता येण्यासाठी आणि परीक्षांचा दर्जा टिकून राहण्यासाठी पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाइन होण्याची गरज असल्याचे प्राध्यापकांकडून सांगण्यात येत आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांच्या स्वायत्त महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू झाल्याने, त्यांना परीक्षांच्या आयोजनाबाबत फारशी अडचण येणार नाही. मात्र, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत परीक्षांच्या आयोजनाबाबत अडचणी येऊ शकतात. परीक्षांच्या आयोजनाबाबत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने तयारी केली असून, दुसऱ्या सत्राची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेऊ. - डॉ. राजेंद्र झुंझारराव, प्राचार्य, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्‌‌स, सायन्स अँड कॉमर्स


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HU9WoW
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या