इस्माईल युसुफ महाविद्यालयात होणार अत्याधुनिक वाचनालय Rojgar News

इस्माईल युसुफ महाविद्यालयात होणार अत्याधुनिक वाचनालय Rojgar News

मुंबई : इस्माईल युसुफ या शासकीय महाविद्यालयाचा सर्वांगिण विकास करुन यात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आधुनिक व दर्जेदार सुविधेसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून या महाविद्यालयात उभारण्यात येणार आहे. इस्माईल युसुफ महाविद्यालयात अनेक विकासकामे सुरू आहेत. यातील अनेक कामे प्रलंबित होत आहे. याचा आढावा घेण्यासाठी आमदार वायकर यांनी महाविद्यालयात बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. इस्माईल युसुफ महाविद्यालयात अत्याधुनिक साधानांनी युक्त असे वाचनालय बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, अशा सुचना वायकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या आहेत. यावेळी सध्या महाविद्यालयात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा रविंद्र वायकर यांनी घेतला. यात सध्या सुरू असलेल्या विकासकामांच्या दर्जाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करीत यात तात्काळ सुधारणा करण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. महाविद्यालयात जी फायरींग रेंज तयार करण्यात येत असून तिचे काम १५ डिसेंबरच्या आत पूर्ण करण्यात यावे, महाविद्यालयात रेन वॉटर हारर्वेस्टीग प्रकल्प राबविण्यात यावा, विज्ञान शाखेच्या इमारतीच्या दुरुस्तीवर वारंवार खर्च करण्यापेक्षा ही इमारत पाडून दुरूस्तीसाठी येणार्‍या खर्चातूनच नविन इमारत बांधण्यात यावी तसा प्रस्ताव तयार करावा, अशी सुचनाही त्यांनी यावेळी अधिकार्‍यांना केली. त्याचबरोबर महाविद्यालयात सुसज्ज असे वाचनालय उभारण्यासाठी नव्याने प्रस्ताव तयार करुन आवारातच इमारत उभारण्यात यावी, अशी सुचनाही वायकर यांनी यावेळी केली. महाविद्यालयाचा अंतर्गत परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. महाविद्यालयात जी विकासकामे करण्यात येणार आहे, त्याच्या टेंडरींगचे काम झाले असून लवकरच वर्क ऑर्डर देण्यात येईल, असे आश्‍वासनही सहा. अभियंता जी. के. दिघावकर यांनी वायकर यांना दिले. या महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या शिक्षण विभागाच्या कार्यालयाचीही आमदार वायकर यांनी पाहणी केली. या इमारतीच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करुनही पावसाळ्यात इमारतीच्या छतावरुन गळती होत असल्याने तसेच येथील महिला व पुरुष शौचालयाची अवस्था दयनिय असल्याने, या ठिकाणी नविन इमारत बांधून कर्मचार्‍यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी येथील कर्मचार्‍यांनी वायकर यांच्याकडे केली. त्यानुसार तसा प्रस्ताव तात्काळ तयार करण्यात यावा, अशी सुचनाही वायकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना केली. या बैठकीत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.स्वाती व्हावळ, सहाय्यक अभियंता सतिश धर्मसाले, कार्यकारी अभियंता प्र.वा. नारखेडे, कार्यकारी अभियंता एस.जी. लोणारे, सहा अभियंता जी. के. दिघावकर, धर्मेश व्यास, जयवंत लाड, शाखा संघटक समिक्षा माळी, विधानसभा समन्वयक स्मिता साळसिंगीकर, जोगेश्‍वरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलिस उप निरिक्षक कोळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32pnit9
via nmkadda

0 Response to "इस्माईल युसुफ महाविद्यालयात होणार अत्याधुनिक वाचनालय Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel