Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ०१, २०२१ WIB
Last Updated 2021-11-01T13:43:55Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

जागतिक संशोधकांच्या क्रमवारीत शिवाजी विद्यापीठाच्या ४८ संशोधकांचा समावेश Rojgar News

Advertisement
कोल्हापूर: जागतिक पातळीवरील ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२१’तर्फे जाहीर करण्यात आलेल्या जागतिक संशोधकांच्या अद्यावत क्रमवारीत शिवाजी विद्यापीठातील कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह एकूण ४८ वैज्ञानिक, संशोधकांचा समावेश झालेला आहे. अमेरिकेच्या मिशीगन विद्यापीठातील प्रा. मूरत आल्पर आणि प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे ‘आल्पर-डॉजर सायंटिफीक इंडेक्स’ तथा ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स’ विश्लेषित केलेला आहे. त्यासाठी त्यांनी गुगल स्कॉलरवरील संशोधकांचा गेल्या पाच वर्षांतील एच-इंडेक्स, आय-टेन इंडेक्स हे निर्देशांक तसेच सायटेशन स्कोअर (उद्धरणे) इत्यादी बाबींचे पृथक्करण केले. जगातल्या १३,५४२ शैक्षणिक संस्थांमधील ५,६५,५५३ संशोधकांचा डाटा त्यांनी संकलित केला. कृषी व वने, कला व स्थापत्य, वाणिज्य व व्यवस्थापन, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, इतिहास, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, कायदे अभ्यास, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान, नैसर्गिक शास्त्रे व सामाजिक शास्त्रे यांसह अन्य २५६ उपशाखांमधील संशोधकांचा समावेश या मानांकनामध्ये करण्यात आला आहे. त्यातून ‘वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग-२०२१’ जाहीर करण्यात आले आहे. अत्यंत व्यापक स्तरावर घेण्यात आलेल्या या क्रमवारीमध्ये ‘अ++’ मानांकित शिवाजी विद्यापीठाच्या ४८ संशोधकांचा समावेश होणे ही महत्त्वाची बाब आहे. या संशोधकांत स्थान प्राप्त करणारे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के संख्याशास्त्र विषयातील एकमेव संशोधक ठरले असून प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांना मटेरियल सायन्स, सौरघट, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, गॅस सेन्सर आणि नॅनोविज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधनासाठी क्रमवारीत आघाडीचे स्थान प्राप्त झाले आहे. सदर क्रमवारीत रसायनशास्त्राचे ११, पदार्थविज्ञान व मटेरियल सायन्सचे ९, वनस्पतीशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवरसायनशास्त्र, नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स या विषयांचे प्रत्येकी ३, प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, धातूविज्ञान, अन्नविज्ञान व फार्मसी या विषयांचे प्रत्येकी २ आणि गणित व संगणकशास्त्राचे प्रत्येकी १ असे एकूण ४८ आजी-माजी संशोधक समाविष्ट आहेत. या संदर्भात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, शिवाजी विद्यापीठात विविध विषयांत अखंडित संशोधन सुरू असून त्याचे हे फलित आहे. यापूर्वीही स्टॅनफोर्ड विद्यापीठाने स्कोपस डाटाच्या आधारे जाहीर केलेल्या जगातल्या आघाडीच्या २ टक्के संशोधकांच्या यादीतही शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचा समावेश होता. त्या संशोधन कार्याला ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स’मुळे पुष्टी लाभली आहे. विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील संशोधकांचे हे कार्य अभिनंदनीय आहे. यापुढील काळातही आपले संशोधनकार्य ते असेच चालवितील, असा मला विश्वास आहे. ए.डी. सायंटिफिक इंडेक्स क्रमवारीत स्थान लाभलेले शिवाजी विद्यापीठातील संशोधक पुढे देण्यात आली आहे. संख्याशास्त्र- १. डॉ. डी.टी. शिर्के पदार्थविज्ञान, मटेरियल सायन्स व धातूविज्ञान- १. डॉ. पी.एस. पाटील २. डॉ. के. वाय. राजपुरे ३. डॉ. सी.एच. भोसले ४. डॉ. आण्णासाहेब मोहोळकर ५. डॉ. एन. आय. तरवाळ ६. डॉ. राजेंद्र सोनकवडे ७. डॉ. टी.जे. शिंदे (के.आर.पी. महाविद्यालय, इस्लामपूर) ८. डॉ. मानसिंग टाकळे ९. डॉ. ए.बी. गडकरी (गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर) १०. डॉ. विजया पुरी (धातूविज्ञान) ११. डॉ. सोनल चोंदे (धातूविज्ञान व मटेरियल सायन्स) रसायनशास्त्र- १ डॉ. के.एम. गरडकर २ डॉ. एस.एस. कोळेकर ३ डॉ. ए.व्ही. घुले ४ डॉ. एस.डी. डेळेकर ५ डॉ. जी.बी. कोळेकर ६ डॉ. डी.एम. पोरे ७ डॉ. राजश्री साळुंखे ८ डॉ. एम.बी. देशमुख ९ डॉ. डी.एच. दगडे १० डॉ. गजानन राशीनकर ११ डॉ. अनंत दोड्डमणी वनस्पतीशास्त्र- १. डॉ. एन. बी. गायकवाड २. डॉ. (श्रीमती) एन.एस. चव्हाण ३. डॉ. डी.के. गायकवाड जैवतंत्रज्ञान व बायोरिमेडिएशन- १. डॉ. एस.पी. गोविंदवार २. डॉ. ज्योती जाधव ३. डॉ. नीरज राणे- जैवतंत्रज्ञान अधिविभागातील संशोधक विद्यार्थी (सध्या पुणे विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल संशोधक) प्राणीशास्त्र- १. डॉ. एम.व्ही. शांताकुमार २. डॉ. टी.व्ही. साठे जैवरसायनशास्त्र- १. डॉ. के.डी. सोनवणे २. डॉ. पंकज पवार ३. डॉ. (श्रीमती) पी.बी. दंडगे इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स - १. डॉ. पी.एन. वासंबेकर (इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स) २. डॉ. टी.डी. डोंगळे (नॅनो-इलेक्ट्रॉनिक्स) ३. डॉ. आर.आर. मुधोळकर (इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी) नॅनोसायन्स व तंत्रज्ञान- १. डॉ. एस.बी. सादळे २. डॉ. एन.आर. प्रसाद ३. डॉ. किरण कुमार शर्मा पर्यावरणशास्त्र- १. डॉ. पी.डी. राऊत (पर्यावरणशास्त्र) २. डॉ. विजय कोरे (पर्यावरण अभियांत्रिकी) अन्नविज्ञान व अभियांत्रिकी- १. डॉ. ए.के. साहू २. डॉ. राहुल रणवीर संगणकशास्त्र- १. डॉ. एस.आर. सावंत गणितशास्त्र- १. डॉ. के.डी. कुचे फार्मसी- १. डॉ. जॉन डिसुझा (तात्यासाहेब कोरे फार्मसी महाविद्यालय, वारणानगर) २. संतोष पायघन


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pTnMRN
via nmkadda