TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

नीट निकालाच्या घोषणेला एक महिना पूर्ण; काऊन्सेलिंग प्रक्रियेला मुहूर्त मिळेना Rojgar News

देशभरातील विविध अखिल भारतीय आयुर्विज्ञा संस्था (All Indian institute Of Medical Scienc,AIIMS) आणि अन्य वैद्यकीय संस्थांमधील मेडिकल आणि डेंटल यूजी कोर्सेस एमबीबीएस व बीडीएस मधील प्रवेशांसाठी घेतलेल्या यूजी २०२१ काऊन्सेलिंग प्रक्रिया लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) द्वारे करण्यात येणार आहे. एनटीए द्वारे नीट यूजी २०२१ निकालाची १ नोव्हेंबर रोजी घोषणा आणि ऑल इंडिया कोट्यातील मेरिट लिस्ट जारी केल्यानंतर उमेदवार काऊन्सेलिंग प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र निकालाची घोषणा होऊन एक महिना लोटला तरी एमसीसीने ऑनलाइन अंडर ग्रॅज्युएट मेडिकल / डेंटल सीट्स ऑनलाइन अलॉटमेंट प्रोसेस (ऑनलाइन काऊन्सेलिंग) 2021 संबंधी आतापर्यंत कोणतीही तारीख वा निश्चित वेळापत्रक जारी केलेले नाही. मात्र, एमसीसी द्वारे अधिकृत पोर्टल, वर ऑनलाइन काऊन्सेलिंग ‘लवकरच उपलब्ध’ होईल अशी अपडेट जारी केली आहे. दुसरीकडे, एनटीएने रविवारी, २८ नोव्हेंबर २०२१ रोजी एक महत्वाची नोटिस जारी केली आहे. यात म्हटले आहे की एजन्सी भूमिका परीक्षेचे आयोजन, निकालांची घोषणा आणि ऑल इंडिया रँकच्या आधारे नीट यूजी मेरिट लिस्ट जारी करण्यापर्यंतच मर्यादित होती. यापुढील प्रक्रिया एमसीसी आणि राज्य काऊन्सेलिंग समितीद्वारे केली जाते. उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की एमसीसी द्वारे ऑल इंडिया कोट्यातील जागा, स्वायत्त विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठे, ईएसआयसी व एएफएमसी जागा, बीएचयू आणि एएमयू च्या जागांवरील प्रवेशांसाठी काऊन्सेलिंग प्रक्रियेचे आयोजन केले जाईल. दुसरीकडे स्टेट कोट्यातील जागांसाठी संबंधित राज्याच्या समितीद्वारे प्रक्रियेचे आयोजन केले जाईल. स्टेट कोटा जागांवरील प्रवेशांसाठी काऊन्सेलिंग साठी उमेदवार यूजी 2021 इंफॉर्मेशन बुलेटिन मध्ये परिशिष्ट-IV में दिलेल्या लिस्टच्या माध्यमातून संबंधित राज्याच्या समितीच्या वेबसाइटवर जाऊ शकतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31gTw96
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या