महाविद्यालये अजूनही विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत Rojgar News

महाविद्यालये अजूनही विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, नाशिक दिवाळी आणि लसीकरणानंतरही महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचा कमीच प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. सोमवार (दि. ८ नोव्हेंबर)पासून शहरातील महाविद्यालये पुन्हा सुरू झालेली असली, तरी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मात्र फारशी वाढ नसल्याचे चित्र आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास दीड वर्ष बंद असलेली महाविद्यालये उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार २० ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली होती. दीड वर्षानंतर प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू होऊनही विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र होते. तोंडावर आलेला दिवाळीचा सण आणि महाविद्यालयातील उपस्थितीसाठी असलेली लशीचे दोन्ही डोस पूर्ण असण्याची अट यासाठी कारणीभूत असल्याचे सांगितल जात होते. त्यानंतर उच्च शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार तातडीने राज्यभरात आठवडाभर विविध महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर दोनच दिवसांत दिवाळी असल्यामुळे शहरातील महाविद्यालयांना १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान सुटी देण्यात आली होती. त्यानंतरही ८ नोव्हेंबरला शहरातील महाविद्यालये सुरू झाल्यानंतर या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती फारशी वाढलेली नसल्याचे चित्र आहे. याबाबत महाविद्यालयांशी संपर्क साधला असता पुढील आठवड्यापासून विद्यार्थिसंख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाचे विद्यार्थी वगळता अन्य वर्षांचे अभ्यासक्रम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून, महिनाभरात या विद्यार्थ्यांच्या पहिल्या सत्र परीक्षा होण्याची शक्यता आहे. महाविद्यालये सुरू करण्यासोबतच ऑनलाइन शिक्षणही सुरू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुढील सत्रापासूनच विद्यार्थी नियमितपणे महाविद्यालयांमध्ये येण्यास सुरुवात करतील, असा अंदाज महाविद्यालयांमार्फत व्यक्त केला जात आहे. महाविद्यालये बंद असताना ती सुरू करण्याची मागणी करणारे विद्यार्थी, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर मात्र त्याकडे पाठ फिरवित आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3H4mU30
via nmkadda

0 Response to "महाविद्यालये अजूनही विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel