TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

दहावी, बारावी परीक्षेचा शुल्क परतावा, की थट्टा? Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'मी बारावीत असून कल्याणला राहतो आणि मला बारावीच्या परीक्षेचा ९४ रुपयांचा शुल्क परतावा घेण्यासाठी ६० रुपये प्रवासखर्च करून जावे लागणार आहे. यामुळे मी हा परतावा न घेण्याचे ठरविले आहे...' ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गतवर्षी दहावीची व बारावीची परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतावा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही रक्कम खूपच कमी असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी कॉलेजपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवासखर्च करण्यापेक्षा परताव्यावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेले शुल्क परत करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची मिळून ही रक्कम १५० कोटींच्या आसपास आहे. यामुळे शिक्षण विभागाने याचा हिशेबही द्यावा, अशीही मागणी करण्यात येत होती. याबाबत 'मटा'ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर मंडळाने अंशत: परतावा करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार कॉलेजांकडून माहिती मागविली होती. आता कॉलेजांना मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या शुल्क परताव्याची रक्कम पोहोचली आहे. ही रक्कम इयत्ता दहावीसाठी प्रति विद्यार्थी ५९ रुपये, तर बारावीसाठी प्रति विद्यार्थी ९४ रुपये इतकी आहे. यामुळे विद्यार्थी, पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेले दहावीचे सुमारे १७ लाख, तर बारावीचे सुमारे १५ लाख विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले होते. मंडळाने या सर्वांकडून त्या-त्या अभ्यासक्रमाप्रमाणे सुमारे चारशे ते ५५० रुपये परीक्षा शुल्कापोटी घेतले आहेत. यापैकी खूपच तोकडी रक्कम परत दिली जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मंडळाने प्रश्नपत्रिकांची छपाई केली आहे, तसेच उत्तरपत्रिकांचीही छपाई केली. यातील रिकाम्या उत्तरपत्रिकांचा पुनर्वापर करता येणे शक्य आहे. असे असतानाही मंडळाने इतकी रक्कम देऊन शुल्क परतावा दिला असा दिखावा का केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किमान ५० टक्के रकमेचा तरी परतावा करावा, अशी मागणी पालक करत आहेत. तर, अनेक विद्यार्थी शुल्क घेण्यासाठी येत नसल्याने मुख्याध्यापकांना अशा विद्यार्थ्यांना फोन करून विनवणी करावी लागत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/319EJwY
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या