आरोग्य भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी युवासेनेकडून 'ही' मागणी Rojgar News

आरोग्य भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी युवासेनेकडून 'ही' मागणी Rojgar News

पुणे: आरोग्य विभागाची पद भरती गट ड च्या परीक्षेचा पेपर एक दिवस आधीच सोशल मीडियात व्हायरल झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच राज्यातील काही परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकेच्या गठ्ठ्यांना सील नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परीक्षेचे आयोजन करणाऱ्या खासगी कंपनीच्या विश्वासआर्हतेबद्दल प्रश्न निर्माण झाले. दरम्यान युवासेनेकडून याप्रकरणी प्रतिक्रिया आली आहे. परीक्षेआधी पेपरफुटीचा मेसेज व्हायरल करण्यात आला याची सत्यता पडताळण्यात यावी अशी मागणी युवासेनेने केली आहे. ३० ऑक्टोबर रोजी व्हायरल झालेल्या मेसेज नंतर मी आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना तातडीने खुलासा करण्यास सांगितले होते. त्यामुळेचं या प्रकरणांना वेळीच आळा बसला. पण परिक्षे दिवशी पुन्हा एकदा असाच एक पेपर फुटीचा मेसेज व्हायरल करण्यात आला आहे. या मेसेज मधील सत्य तपासण्यासाठी सायबर क्राईम विभागाने याबाबत कार्यवाही करावी. अशी मागणी युवासेनेच्या कल्पेश यादव यांनी आरोग्य विभाग, गृहमंत्री आणि पोलीस खात्याकडे केली आहे. मेसेजमध्ये तथ्य असल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच हा मेसेज फेक असल्यास तो पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. या एका मेसेज मुळे अनेक वर्षे अभ्यास करणाऱ्या तरुणांचे भवितव्य पणाला लागले आहे. त्यांचे भविष्य अंधारात असल्याने आशा प्रवृतींवर तातडीने कारवाई होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. सायबर क्राईम विभागाच्या मदतीने या मेसेजच्या मुळापर्यंत पोहचून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. तसेच आरोग्य विभागाने याप्रकरणाची तक्रार सायबर क्राईमकडे द्यावी अशी विनंती आरोग्य विभागाला युवासेनेकडून करण्यात आली आहे. विद्यार्थी हिताच्या आडव्या येणाऱ्या घटकांवर कारवाई करणे हे आरोग्य विभाग तसेचं राज्यसरकारचे कर्तव्य असल्याचे देखील यादव यावेळी म्हणाले. आरोग्य विभागाकडून गट 'क' आणि 'ड' पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या परीक्षेची जबाबदारी खासगी आयटी कंपनी ‘न्यासा कम्युनिकेशन्स’कडे दिली आहे. गेल्या रविवारी ‘क’ गटाच्या पदांसाठी लेखी परीक्षा झाली. या परीक्षेतही काही परीक्षा केंद्रांवर गोंधळ आणि गैरप्रकार झाले. त्यामुळे गट ‘ड’ पदासाठी सकाळ आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या परीक्षेत गोंधळ होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फौज उभी केली होती; मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नसल्याचे रविवारी घडलेल्या प्रकारामुळे स्पष्ट झाले. प्रश्नपत्रिका व्हायरल गट ‘ड’ संवर्गातील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यालयातील ४२ संवर्गातील ७८ कार्यालयातील तीन हजार ४६२ पदे भरण्यासाठी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी चार लाख ६१ हजार ४९७ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यानुसार राज्यातील १३६४ केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले. दुपारी दोन ते चार या वेळेत ही परीक्षा झाली. मात्र, सकाळी साडेआठच्या सुमारास उमेदवारांच्या व्हॉट्सअॅप, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाली. प्रश्नपत्रिका गहाळ होऊ नये, यासाठी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि त्याची उत्तरे कोऱ्या कागदावर लिहिली होती. या दोन्हींची एकत्रित पीडीएफ सकाळी व्हायरल झाली होती. परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांनी व्हायरल झालेली पीडीएफ, प्रश्नपत्रिका; तसेच प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका तपासली असता, तेच प्रश्न आणि उत्तरे होती. यानंतर राज्यातील उमेदवारांनी आरोग्य विभागाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे. पुण्यासह राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठ्यांना सील नव्हते. याबाबत भंडारा येथील स्व. सुलोचनादेवी पारधी हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी चित्रीकरण करून पुरावा दिला आहे. राज्य सरकारने तातडीने संपूर्ण प्रकाराची चौकशी करून, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समिती, एमपीएससी स्टुडन्ट राइट्स, युवक क्रांती दल आदी संघटनांकडून करण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nG9jWA
via nmkadda

0 Response to "आरोग्य भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी युवासेनेकडून 'ही' मागणी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel