गेम डिझाइनिंग आणि डेव्हलपर क्षेत्रात करा करिअर Rojgar News

गेम डिझाइनिंग आणि डेव्हलपर क्षेत्रात करा करिअर Rojgar News

and Developer: आता प्रत्येक काम कॉम्प्युटर, मोबाईल आणि विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होते म्हणून आजच्या काळाला डिजिटल युग म्हटले जाते. या डिजिटायझेशनमुळे खेळ आणि खेळण्याची पद्धतही बदलली आहे. पूर्वी मुलं मित्रांसोबत रस्त्यावर किंवा घराबाहेर पार्कमध्ये गेम खेळायचे पण आजच्या काळातील मुलं मित्रांसोबत घरी बसून स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर सीओडी, जीटीए, फिफा, पब्जी किंवा डोटा सारखे गेम खेळत असतात. मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर गेम खेळण्याच्या या तंत्राला डिजिटल गेमिंग म्हणतात. डिजिटल गेमिंग खेळणाऱ्यांची संख्या जगभरात वाढतेय. म्हणूनच डिजिटल गेमिंग क्षेत्रात चांगले करिअर करण्याची संधी आहे. यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, अनुभव याची सविस्तर माहिती जाणून घ्या. गेम डिझायनिंगमध्ये सर्टिफिकेट लेव्हल कोर्स करण्यासाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट लेव्हल कोर्स करण्यासाठी तुम्ही बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी, तुमच्याकडे कोणत्याही टेक्निकल क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे. प्रमुख अभ्यासक्रम गेमिंग इंडस्ट्रीत येण्यासाठी आजच्या काळात अनेक कोर्सेस आहेत. यातून तुम्ही तुमच्या आवडीनुसार अभ्यासक्रम निवडू शकता. सर्टिफिकेट लेव्हल कोर्सेस करायचे असतील तर गेमिंगमधील सर्टिफिकेट कोर्सेस, गेम आर्ट आणि डिझाइनमधील सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध आहेत. डिप्लोमासाठी डिप्लोमा इन गेम डिझाईन आणि इंटिग्रेशन, प्रोफेशनल डिप्लोमा इन गेम आर्ट, डिप्लोमा इन अॅनिमेशन, गेमिंग आणि स्पेशल इफेक्ट्स, अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन गेम आर्ट आणि थ्रीडी गेम कंटेंट क्रिएशन यासारखे कोर्स करता येऊ शकतात. ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही ग्राफिक्स, अॅनिमेशन आणि गेमिंगमध्ये बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc.), डिजिटल फिल्ममेकिंग आणि अॅनिमेशनमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स (BA), कॉम्प्युटर सायन्स आणि गेम डेव्हलपमेंटमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी-टेक) हे कोर्स करु शकता. अॅनिमेशन गेम डिझाईन आणि डेव्हलपमेंटमध्ये बॅचलर ऑफ सायन्स कोर्स करता येईल. तसेच तुम्हाला या विषयांमध्ये पदव्युत्तर स्तराचा अभ्यासक्रमही मिळू शकेल. गेम डिझायनर आणि डेव्हलपरमधील करिअर गेम डिझायनिंग आणि डेव्हलपमेंट ही एक अवघड प्रक्रिया आहे. ज्यामध्ये अनेक व्यावसायिक गेम तयार करण्यासाठी एकत्र काम करतात. त्यानंतर तो गेम स्क्रीनवर पोहोचतो. कोणताही खेळ तयार करण्यासाठी अनेक प्रक्रियांचा पार पाडल्या जातात. त्यामुळे गेमिंग क्षेत्रातील प्रोफेशनल्सना नेहमीच मोठी मागणी असते. या क्षेत्रात तुम्ही गेम डिझायनर आणि डेव्हलपर म्हणून उत्तम करिअर करू शकता. लोकं ऑनलाइन गेमकडे वळत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात करिअरची नवी दारे उघडत आहेत. येथे तुम्ही अॅक्शन, स्पोर्ट्स, फॅन्टसी इत्यादी अनेक प्रकारचे गेम्स तयार करू शकता. कोरोनापासून भारतातील गेमिंग उद्योग तेजीत आला आहे. त्यामुळे गेमिंगचे चाहते किंवा चाहत्यांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. तुम्हाला गेम डिझायनर, गेम प्रोड्युसर, अॅनिमेटर, ऑडिओ प्रोग्रामर, ग्राफिक प्रोग्रामर आणि गेम रायटर सारख्या जॉब प्रोफाइल मिळू शकतात. पगार कोर्स पूर्ण केल्यानंतर, तुम्ही गेम डिझायनर आणि डेव्हलपर म्हणून ४ ते ५ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज सहज घेऊ शकता. त्याचबरोबर काही वर्षांच्या अनुभवानंतर तुमच्या टॅलेंटच्या जोरावर तुम्ही महिन्याला लाखो रुपये पगार घेऊ शकता. अभ्यासक्रमासाठी प्रमुख संस्था माया अकॅडेमी ऑफ अॅडव्हान्स्ड सिनेमॅटिक (MAAC), मुंबई अरेना अॅनिमेशन, नवी दिल्ली भारती विद्यापीठ, पुणे आय पिक्सिओ अॅनिमेशन कॉलेज, बंगळूर एनीमास्टर अॅकेडमी- कॉलेज ऑफ एक्सलन्स इन अॅनिमेशन, बंगळूर अॅनिमेशन आणि गेमिंग अकादमी, नोएडा झी इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट्स, बंगळूर


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3D7Of1R
via nmkadda

0 Response to "गेम डिझाइनिंग आणि डेव्हलपर क्षेत्रात करा करिअर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel