TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

तंत्रशिक्षण प्रवेशांच्या गुणवत्ता याद्या जाहीर Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना अखेर सुरुवात झाली आहे. सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे () विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, काही अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना पर्याय निवडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. सीईटी सेलकडून तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकाद्वारे प्रवेश प्रक्रिया होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार बी.एचएमसीटी (हॉटेल मॅनेजमेंट पदवी), एमबीए, एमएमएस या अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी सोमवारी (२९ नोव्हेंबर) जाहीर करण्यात आली आहे. एम. फार्मसी (पदव्युत्तर) अभ्यासक्रमाची अंतिम गुणवत्ता यादी मंगळवारी, (३० नोव्हेंबर) जाहीर होणार आहे. एम. ई., एम. टेक, बी. आर्क, बी. ई. (थेट द्वितीय वर्ष), बी. फार्म (थेट द्वितीय वर्ष) या अभ्यासक्रमांची अंतिम गुणवत्ता यादी यापूर्वीच जाहीर झाली असून विद्यार्थ्यांना पर्याय निवडीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकी (बी. ई.) आणि एमसीए (पदव्युत्तर) या अभ्यासक्रमांचीही गुणवत्ता यादी सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्याय निवडीसाठी एक नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सर्व कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियाही मंगळवारपासून सुरू होणार असल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रवेशांसाठी सीईटी सेलच्या वेबसाइटवर प्रवेश पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या प्रवेशांसंबंधी सविस्तर माहिती आहे. विद्यार्थ्यांनी पर्याय निवडताना आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना प्रवेश पुस्तिकेचे वाचन करावे, पर्याय चुकवू नयेत, असे सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे. सीईटी सेलकडून प्रवेशांसाठी देण्यात आलेल्या मुदतीतच प्रवेश निश्चित करण्याच्या स्पष्ट सूचनाही सीईटी सेलने दिल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cZ6jjo
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या